‘नाना पटोले नावाचा सुमार बुध्दीचा माणूस, त्यांच्या सुमार बुद्धीची कीव येते’

मुंबई – गायवर्गीय पशूंना ‘लम्पी स्किन डिसीज’ (Lumpy skin disease) या साथीच्या रोगाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये या आजाराची साथ परसली आहे. तसेच, यावरती उपाय रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे रोगाचा संसर्ग होण्याचा वेग कमी आला आहे. त्यात आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी लम्पी रोगाबाबत अजबच दावा केला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, “लम्पी हा आजार नायजेरियातून आला आहे. देशात चित्तेही नायजेरियातून आणले आहे. चित्त्यांच्या आणि गायींच्या अंगावरील ठिपके सारखेच आहेत. मोदी सरकारने जाणून बुजून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी चित्त्यांना भारतात आणले,” असे नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून भाजप नेते प्रवीण अलई (BJP leader Pravin Alai) यांनी खोचक शब्दात पटोले यांच्यावर शरसंधान केले आहे. ते म्हणतात,तर पाण्याच्या विहिरीला पाणी किती? मित्रहो नाना पटोले नावाचा सुमार बुध्दीचा माणूस दररोज आपली मुक्ताफळे उधळत असतात.परवा त्यानी असेच लंपी रोग मोदींनी आणलेल्या चित्त्यामुळे पसरला असे चमत्कारिक विधान केले. जे पंतप्रधान भारताच्या विकासासाठी अहोरात्र झटत आहेत.भारत कोणत्याही दृष्टीने मागे न राहता तो सर्वार्थाने बलशाली झाला पाहिजे, यासाठी झटत आहेत. भारतात पूर्वी असलेले परंतु आता नामशेष झालेले चित्त्यासारखे प्राणी भारतात आणून पोकळी भरून काढीत असताना, पटोले सारखा सुमार बुध्दीचा माणूस याचा संबंध लम्पी रोगाशी जोडत असतील, तर त्यांच्या सुमार बुद्धीची कीव येते.

नाहीतरी या पक्षाकडून व नेत्यांकडून बुद्धीची अपेक्षा आता ठेवणे गैरच आहे. लोकांचेप्रश्न घेऊन उभे राहण्यापेक्षा हा पक्ष आपली सर्व शक्ती मोदी द्वेषiवर खर्च करीत स्वतः संपतही आहे. राहुल व पटोले हे सुमार बुध्दीचे नेत्यांची बुद्धीची कीव येते.संबंध नसताना ओढून ताणून मोदीजिशी संबंध जोडतात.मला आचार्य अत्रे यांनी एका भाषणात सांगितलेला किस्सा आठवतो. एका झाडाला 8नारळे तर पाण्याच्या विहिरीला पाणी किती? झाड व पाणी यांचा संबंध काय? तसे चित्ता आणि मोदीजी यांचा संबंध काय? पण हे काँग्रेस चे नेते ना? काय अपेक्षा करणार?  बघतोय महाराष्ट्र.अशी बोचरी टीका अलई यांनी केली आहे.