Baramati LokSabha | बारामतीत अपक्ष उमेदवाराला मिळाले तुतारी निवडणूक चिन्ह, शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे धाव

Baramati LokSabha | लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शरद पवार गटाला तुतारी वाजणारा माणुस हे निवडणुक चिन्ह देण्यात आलं आहे. त्यावर सुप्रिया सुळे निवडणुक लढवत आहेत. मात्र बारामती लोकसभा मतदारसंघात एका अपक्ष उमेदवाराला देखील तुतारी हे चिन्ह देण्यात आल्याने शरद पवार गटाने आता केंद्रीय निवडणुक आयोगाकडे धाव घेतली आहे.

बारामतीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना होत आहे. अशातच लोकसभेच्या निवडणुक चिन्ह वाटपात सोयल शहा युनूस शहा या अपक्ष उमेदवाराला तुतारी हे चिन्ह देण्यात आलं आहे. त्यावरून शरद पवार गटाने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाविरोधात शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे निवडणुक आयोग काय निर्णय घेणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान बारामती लोकसभा (Baramati LokSabha ) मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. बारामतीतील निवडणुकीसाठी एकूण ५० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची २० एप्रिलला पडताळणी झाली. त्यामध्ये पाच अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. तर ४६ अर्ज वैध ठरवण्यात आले होते. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बारामती मतदारसंघातून ३८ उमेदवार रिंगणामध्ये राहिले आहेत. या ३८ उमेदवारांना सोमवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले .

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचा सहाही विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुराळा, विविध समाजघटकांकडून स्वागत

Amol Kolhe | दिल्लीचे तख्त पलटवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मनगटात आहे

Sunil Shelke On Rohit Pawar: रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायचीय, सुनील शेळकेंचा निशाणा