जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता; अनंत करमुसे मारहाण प्रकरणात मानवाधिकार आयोगाची नोटीस

मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना मानवाधिकार आयोगाची नोटीस आलीय. अनंत करमुसे मारहाण प्रकरणात ही नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालीय.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, अनंत करमुसे मारहाण प्रकरणात मानवाधिकार आयोगाने जितेंद्र आव्हाड आणि तीन पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. आयोगाने जितेंद्र आव्हाड यांना हजर राहून उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणात जितेंद्र आव्हाड किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, आता जितेंद्र आव्हाड आयोगाच्या नोटीसला काय उत्तर देणार? किंवा आव्हाड नोटीसीनुसार मानवाधिकार आयोगासमोर उपस्थित राहून उत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सोबतच पिडीत अनंत करमुसे यांना न्याय  मिळणार का हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.