Manoj Jarange | “४८ पैकी तुमचा एकही खासदार निवडून येऊ देणार नाही”; मनोज जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Manoj Jarange | लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपाने कंबर कसली आहे. अबकी बार ४०० पारचा नारा लगावत भाजपा लोकसभा निवडणुकीत उतरणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. दरम्यान मराठा आरक्षणाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपालाच आव्हान दिलं आहे. तसेच, तुमचा सुफडा साफ होईल, एकही खासदार निवडून येणार नाही, असे जरांगे यांनी म्हटले.

फडणवीस यांनी माझ्या विरूद्ध पोलिस कारवाई सुरू केली आहे. इतरांना वेगळा न्याय व मला वेगळा न्याय दिला जात असल्याचे म्हणत जरांगे यांनी थेट निवडणुकांचं चॅलेंज दिलं आहे. तुमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुम्हाला जे करायंच आहे ते तुम्ही करा, पण मला जे करायचंय ते मी करणार, तुम्ही काहीही व्हिडिओ आणा आणि कसल्याही रेकॉर्डींग आणा. पण, तुमच्या मुंडक्यावर पाय ठेऊनच मी आरक्षण घेणार, असे जरांगे यांनी म्हटलं आहे. तुम्ही मला किती बदनाम केलं, पण समाजासाठी एक इंचही मी मागे हटणार नाही, असे जरांगे यांनी म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, मला बदनाम करुन मराठा समाजापासून तोडण्याचा प्रयत्न जर केला, तर भाजपाच्या ४८ पैकी एकही खासदार आणि आमदार निवडून येऊन द्यायचा नाही, असे आवाहनच मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाला केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | निलेशला मीच पक्षात आणलं, त्याला प्रचंड निधीही दिला, पण…. अजित पवारांनी मनातली खदखद बोलून दाखवली

Ajit Pawar | पक्षातून वेगळे झालात, मग शरद पवारांचे फोटो कशाला वापरता? सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना फटकारले

Nitin Gadkari | नागपूर शहरात २४ तास पाणी पुरवठ्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे