Pune Accident: “तो रॅप साँगचा व्हिडिओ माझ्या मुलाचा नाही”, अल्पवयीन आरोपीची आई आली समोर

Pune Accident: पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणावरुन सध्या महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. पुण्यातील बिल्डरच्या मुलाने भरधाव वेगाने पोर्श कारखाली दुचाकीस्वारांना चिरडले, ज्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केल्यानंतर काही तासातंच त्याला जामीन मिळाला. त्यानंतर या अल्पवयीन आरोपीचे रॅप साँग सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यात तो आई-बहिणींना शिवीगाळ करताना दिसत आहे.

अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे जामीन मिळाल्यानंतर चक्क रॅप साँग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सेल्फी व्हिडिओत तो प्रचंड शिवीगाळ तर करत आहेच, पण चीड, संताप, येईल असे शब्द त्याने उच्चारले आहेत. या रॅप साँगमधून तो ‘हो मी आहे बिल्डरचा पोरगा म्हणून सुटलोय’, असं म्हणत त्यानंतर रॅपमधून अत्यंत खालच्या पातळीवर जात शिवीगाळ करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे लोकांमध्ये त्याच्यासंबंधी रोष आणखी वाढला आहे. परंतु आता अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांनी आपली प्रतिक्रिया देत ते रॅप साँग आपल्या मुलाचं नसल्याचं म्हटलं आहे.

व्हिडिओ पोस्ट करत शिवाणी अग्रवाल म्हणाल्या, माझी मीडियाला विनंती आहे की रॅप साँगचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे तो माझ्या मुलाचा नसून तो फेक आहे. माझा मुलगा बाल सुधार कारागृहात असल्याचं शिवानी अग्रवाल सांगत आहेत. त्यासोबतच प्लीज माझ्या मुलाला वाचवा अशी विनंतीही शिवानी अग्रवाल यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप