Big Breaking : पुण्याचे लोकप्रिय खासदार गिरीश बापट यांचे निधन

Pune: महाराष्ट्राच्या राजकारणातून अत्यंत दुख:द बातमी पुढे आली आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish bapat) यांचे आज निधन झाले आहे. त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी गिरीजा बापट आणि मुलगा गौरव बापट व सून असा परिवार आहे. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

गिरीश बापट हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. कसबा पेठ निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी घेतलेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात ते शेवटचे दिसले होते. त्यावेळी त्यांना इतकं आजारी असताना भाजपाने प्रचारात का उतरवलं म्हणून टीकाही झाली होती.

त्यानंतर बुधवारी सकाळी (२९ मार्च) त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथे त्यांना आयसीयूत लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आल्याचं रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.