कुंभारगावचे सुपुत्र विलास धोत्रे यांचा पुण्यात विशेष सेवा पदक देऊन सन्मान

करमाळा- पुणे येथे सायबर क्राईम ब्रँच विभागात पोलीस उप निरिक्षक पदी असलेले विलास अशोक धोत्रे (Vilas Dhotre) यांनी आपल्या कुटुंबासह, गाव आणि समस्त महाराष्ट्राची मान उंचावली आहे. करमाळा तालुक्यातील कुंभारगावचे सुपुत्र विलास धोत्रे यांचा विशेष पदक देऊन सन्मान करण्यात आला आहे.

विलास धोत्रे यांनी गडचिरोली येथे कर्तव्यावर असताना नक्षलदृष्ट आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जिल्ह्यात खडतर सेवा केली. त्याच बरोबर गुणवत्तापूर्वक व अतिअतिउत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल माननीय पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या हस्ते सीपीआर पुणे येथे विशेष सेवा पदक  वितरित करण्यात आले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.