पुणे विद्यापीठातील वादग्रस्त रामायण प्रकरणी प्रसिद्ध दिग्दर्शकाची लांबलचक पोस्ट, म्हणाले….

Pune SPPU News: पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) ललित कला केंद्रात (Lalit Kala Kendra) ‘बिहाइंड द स्क्रीन लाइफ ऑफ द ॲक्टर्स प्लेइंग रामलीला’ हा कार्यक्रम रंगला. मात्र स्टेजिंगदरम्यानच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि नाटक सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या नाटकात माता सीतेशी संबंधित अनेक आक्षेपार्ह संवाद आणि दृश्ये असल्याचा आरोप अभाविपने केला आहे.

वाद वाढत गेल्याने प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. त्यानंतर रामलीलावर आधारित नाटक करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी विद्यापीठातील प्राध्यापक आणि ५ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी लेखक व दिग्दर्शक मिलिंद शिंत्रे (Milind Shintre) यांनी लांबलचक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.

मिलिंद शिंत्रे यांची फेसबुक पोस्ट – 

पुणे विद्यापीठात ललित कला केंद्र, नावाचा एक नाट्यप्रशिक्षण विभाग आहे. येथे नाटक शिकवले जाते. नाटक शिकण्यासाठी आलेल्यांची तिथे एण्टरन्स एक्झाम होते. म्हणजे तिथे निवडून वगैरे विद्यार्थी घेतले जातात. काही वर्षांपूर्वी ललितच्या एण्टरन्स एक्झामचा एक पेपर आमच्या हातात पडला होता. त्यात असे काही प्रश्न होते.

नाटक सुरू होण्यापूर्वी किती घंटा होतात ?
सुरेखा पुणेकर ह्या कोण आहेत ?
सध्या उपराष्ट्रपती कोण आहे ?
सानिया मिर्झा कोणता खेळ खेळते ?
अमुक एक रंगमंदीर कुठे आहे ?
यातले कोणते नाटक संतोष पवार यांनी दिग्दर्शित केले आहे ?
अमुक नाटकाचा लेखक कोण आहे ?
नाटकाचे प्रयोग कुठे होतात- रंगमंदीर की मंगल कार्यालयात ?

नाटकापूर्वी काय जाळतात ?
असे आणि या दर्जाचे साधारण वीस प्रश्न होते. असे विद्वत्तापूर्ण प्रश्न बघून आम्ही ललित कला केंद्राचे फॅनच झालो. हे प्रश्न बघून दिपलोच आम्ही. हे प्रश्न विचारणारे लोक महान असणार, अशी आमची खात्रीच पटली. एवढ्या अवघड प्रश्नांची उत्तरे देणारे कलाकार, तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाची कला समाजाला आमरण पुरवणार, याबद्दल आम्हाला शंकाच राहिली नाही. लोक उगाच त्या एनएसडीला जातात, त्यांनी इथे यायला हवे, असे आम्हाला नेहमी वाटते.

तर अशा या ललितमध्ये काल एक नाटक सादर केले गेले. त्याचे कथानक आणि सादरीकरण साधारण असे होते (असे कानावर आले.) :
एका खेड्यातले लोक रामलीला सादर करणार असतात. त्यात अभिनय करण्यासाठी स्त्रिया मिळत नसतात. म्हणून सीतेची भूमिका पुरुषच करतो. आता कलाकारांनी रंगमंचाचे दोन भाग केले होते. एका भागात स्टेज आणि दुसऱ्या भागात ग्रीनरूम. तर कशामुळे तरी नाटकातला राम पळून जातो. यावरून नाटकात काही राम नाही, असा अर्थ लगेच काढू नये. तर तो राम पळून गेल्यानंतर “राम भागा भागा रे राम भागा भागा” असे एक गाणे कोरस गाऊ लागतो. त्याबरोबर झांजा वगैरेही वाजतात. ग्रीनरूममध्ये सीतेची भूमिका करणारा नट बसलेला असतो. तो बिड्या पितो. त्याला ती बिडी रावण किंवा लक्ष्मणाची भूमिका करणारा कलावंत पेटवून देतो. मग सीतेची भूमिका करणारा कलावंत “भेंचोत” अशी शिवी देतो. आईच्या संभोगाविषयी आणखी काही शिव्या देतो म्हणे. आता खेडेगावातील कलाकार म्हणल्यावर शिव्या आणि बिड्या आल्याच….. म्हणजे असे ललित कला केंद्रात शिकवले गेले असावे……आणि ललितमध्ये शिकवलेले योग्यच असणार. कितीही झाले तरी, पुण्यातली संस्था आहे आमच्या. तर विषय एवढाच आहे. तर हे नाटक सुमारे १५-२० मिनिटे झाले…आणि काही लोकांना या दृश्यांचा राग आला आणि मग ते रिअॅक्ट झाले. त्यांच्या रिअॅक्ट होण्यामुळे अजून काही लोक रिअॅक्ट झाले. आणि हे प्रकार वाढत जाऊन तिथे गोंधळ झाला, शिवीगाळ झाली, मारामारी झाली…आणि हे नाटक तिथेच बंद पडले. शिवाय हे नाटक न आवडलेल्या लोकांना काही विद्यार्थ्यांनी मारहाण केली, अशी तक्रार पोलिसात नोंदवली गेली आणि ४-५ विद्यार्थी आणि नाट्यविभागाचे शिक्षक प्रा. प्रवीण भोळे यांना अटक झाली. [ असे कळले. खरे खोटे माहिती नाही.]

या सर्व प्रकारावरून नाट्यवर्तुळात खूप तरंग उमटले. या वर्तुळाची त्रिज्या तशी लहान असल्याने फार काही लोकांपर्यंत ही घटना पोचली नाही. परंतु अभिव्यक्तीस्वातंत्र्याची पायमल्ली झाली, कलेचा आवाज चेपला गेला असे वाटणाऱ्या कलाकारांनी ही बातमी फैलावली आणि मग लोकशाही पद्धतीप्रमाणे सर्व लोक व्यक्त होवू लागले. आमच्या मनात काही मुद्दे आणि शंका आल्या, त्या आम्ही काही पुरोभ्रमी लोकांना विचारल्या पण त्यांनी

उत्तर दिले नाही. त्या अशा :
[१] सदरहू नाटक सादर करण्यापूर्वी सेन्सॉर केले जाते का ? जर नसेल तर त्याची जबाबदारी कोण घेते ?
[२ ] नाटक आवडले नाही, तर वेगळ्या पद्धतीने निषेध करायला हवा, असे काही विचारवंतांनी नुकतेच सांगितले. तर आता ही निषेध करायची वेगळी पद्धत ललित कला केंद्रात शिकवली जाते की जेएनयू मध्ये ? नेमके काय करायचे प्रेक्षकांनी ? नाटक आवडले नाही तर पांढरी फडकी आणि मेणबत्त्या घेऊन नटराजाच्या पायाशी उभे राहायचे का ??

[३] अभिव्यक्तीस्वातंत्र्य महत्त्वाचे आहे, हे आपल्याला माहिती आहेच. एमएफ हुसेन नावाचा एक जराजर्जर म्हातारा चित्र काढायचा. त्याने हिंदू देवतांची नग्न चित्रे काढली होती. भारतमातेचेही विवाद्य चित्र काढले होते थेरड्याने. त्याचे त्याच्या स्वतःच्या आईशी आणि बहिणीशी शारीरिक संबंध होते आणि त्यामुळेच हा हुसेनडा गुप्तरोगाने मेला, असे काही लोक म्हणतात. पण असू दे. आपल्याला काय करायचे आहे त्याच्याशी ? आईबहीणींशी कसे अभिव्यक्त व्हावे हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. तर हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य फक्त हिंदू देवतांबद्दल असल्याचे, हुसेनड्यासारखे ललित कलाकारांना माहिती होते. तशी स्कीमच आहे कलाक्षेत्रात. अभिव्यक्तीस्वातंत्र्य इतर धर्म आणि धर्मियांबद्दल नसते. हिंदू देव, देवता, हिंदूंचे आदर्श यांना कसेही ठोकले तरी चालते. आता ही सवलत जर का भोळ्या भाबड्या कलाकारांनी वापरली तर कोणाच्या पोटात दुखायचे काय कारण आहे ? ही त्या कलाकारांची चूक कशी काय म्हणता येईल ?

[४] भेंचोतत्त्व : हे एक वेगळेच तत्त्व आहे. ललित कलाकार हे अतिशय लहान असल्याने भेंचोत या शिवीचा अर्थ त्यांना माहिती असणे शक्यच नाही, असे एक माणूस आम्हाला म्हणाला. आम्हालाही ते पटले. बहिणीशी रत होणाऱ्याला भेंचोत असे म्हणतात, हे आम्ही त्याला सांगून टाकले. तो आता त्या कलाकरांना हा अर्थ जाऊन सांगेल. तोपर्यंत आता सीतेची भूमिका करणाऱ्या इनोसंट नटाला हा अर्थ माहिती नाही, असे आपण गृहीत धरू. पण त्याने ग्रीनरूममध्ये भेंचोत असे उद्गार काढू नयेत किंवा त्याने बिड्या पिऊ नयेत, हे तुम्ही कोण सांगणार ? बिड्या पिणे किंवा भेंचोत म्हणणे ही त्या कलाकारांची वैयक्तिक बाब आहे. कलाकार कोणतेही व्यसन करू शकतात किंवा वाट्टेल त्या शिव्या देऊ शकतात. जेएनयू आणि एफटीआय मधले बरेच विद्यार्थी गांजा, हेरोईन, गर्द वगैरे घेतात…मग ललितवाल्यांनी काय घोडे मारले आहे ?

[ ५ ] सीतेची भूमिका करणाऱ्याने शिवीगाळ करणे आणि बिड्या पिणे यामुळे लोकांच्या मनातील सीतेची प्रतिमा डागाळते. आता देवांची प्रतिमा डागाळणे किंवा त्यांच्या मूर्ती तोडणे यात फारसा फरक नाही. प्रतिमाभंजन आणि मूर्तीभंजन हे काय हिंदूंना नवीन आहे काय ? बाबराने रामाची मूर्ती तोडून मंदीर नष्ट केलं, तर तुम्ही परत बांधलंत ना ते लोचटासारखे पाचशे वर्षांनी ? आता त्यात हे नाटक पूर्ण होवू दिलं असतं तर तीन तासांची भर पडली असती. कलाकार एवढी मेहनत घेऊन नाटक बसवतात आणि तुम्हाला तीन तास धीर धरवत नाही म्हणजे काय ? २२ जानेवारीला अयोध्यानगरीतील राममंदीरातील रामाची प्रतिष्ठापना झाल्यावर एफटीआयच्या विद्यार्थ्यांनी कसे सुवाच्य अक्षरात बोर्ड लावले होते, “आम्ही बाबरी पाडल्याचा निषेध करतो.” तसे बोर्ड कालच्या प्रेक्षकांनी लावायला काय हरकत होती ? “आम्ही सीतेची भूमिका लिहिणाऱ्या लेखकाचा, दिग्दर्शकाचा आणि कलावंताचा निषेध करतो !” असा करायचा निषेध. पण हे अभाविपचे कार्यकर्ते काही तरी भलतेच करून बसले आणि मग त्यांनी विद्यार्थ्यांकडून मार खाल्ला. आता खरे खोटे, योग्य, अयोग्य कोर्ट ठरवेलच. आपण त्यात पडायचे कारण नाही.

[६] कला आणि कलाकार जपले पाहिजेत. : जपणूक या स्कीममध्ये मुसलमान आक्रमकांनी पाडलेली ८०,००० मंदीरं कधी येणार ? आणि आक्रमकांना नसतील आवडली मंदीरं तर तिथे एफटीआयच्या विद्यार्थ्यांसारखे बोर्ड घेऊन उभे नाही का राहायचे त्यांनी ? की बुवा ही मंदीरे आम्हाला आवडली नाहीत, सबब ती पाडून टाकावीत…पण आक्रमकांचे चुकलेच. त्यांनी मंदिरे पाडून टाकली. वर स्वतःच्या बखरीत आभिमानाने आकडे वगैरे लिहिले आहेत या लोकांनी. स्वतःला बुतशिकन वगैरे म्हणवून घेतले आहे यांनी. असो, तर मुद्दा हा की हिंदूंनी स्वतःचे आदर्श, देवदेवता यांचे थोडे अपमान सहन केले पाहिजेत. दिवसातून तीनच प्रयोग होतात नाटकाचे. दिवसातून पाचवेळा कानांना होणारा त्रास आणि तीनदा अपमान सहन केला तर काय बिघडले ? शिवाय यामुळे कलेला बहर येतो, हा फायदा विसरून कसे चालेल ?

[७] एक जबरी आयडिया : ज्यांना हिंदू धर्म, देव, देवता आणि इतर आदर्श यांची टिंगलटवाळी, चेष्टा मस्करी, अपमान, छी थू किंवा अजून काही करायचे आहे, त्यांनी तसे जाहिरातीमध्ये आधीच सांगून टाकावे. म्हणजे हळवे हिंदू तिथे येणारच नाहीत… आणि आपला वेळ व पैसा वाया घालवणार नाहीत. जी काही कला असेल ती कलासक्त लोकांनी एकमेकांना दाखवावी…… म्हणजे कलेची गळचेपी नको आणि कोणाच्या भावनाही दुखायला नकोत !!

[८] शेवटचा मुद्दा : या ललित प्रकरणानंतर नाटक आणि हिंसा या विषयांवर अनेक चर्चा झाल्या. कोणत्याही हिंसेला आमचे समर्थन नाहीच, हे लक्षात आल्यानंतर काही पुरोभ्रमी विचारवंत सुखावले. हेच विचारवंत गेल्या ८००/९०० वर्षांत मुसलमान आक्रमकांनी केलेल्या हिंसेकडे डोळेझाक करतात, हा विषय वेगळा. तर, हिंसेवरून आठवले, की हे शाब्दिक आणि शारीरिक हिंसा करून, काल अटकेत गेलेले ललितचे विद्यार्थी, काही महिन्यांनंतर प्रशिक्षित होवून बाहेर येणार….मग ते व्यावसायिक नाटक, चित्रपट, मालिका करू लागणार. त्यामुळे लक्षात ठेवा, उर्वरीत आयुष्यात प्रेक्षकांनी त्यांची कोणतीही कलाकृती अडवू नये, उधळून लावू नये. नाही आवडली तर योग्य पद्धतीने निषेध नोंदवावा. योग्य पद्धत कोणती, ते पुरोभ्रमी कलाअकादमी कडून कळेलच !!

महत्वाच्या बातम्या-

Vijay Thalapathy | सुपरस्टार विजय थलपतीची राजकारणात एन्ट्री, पक्षाचीही केली घोषणा; पाहा लोकसभा लढवणार का?

Supriya Sule | …म्हणून देवेंद्र फडणवीसांची तक्रार सुप्रिया सुळे आता थेट अमित शाह यांच्याकडे करणार

Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली महेश गायकवाड यांची भेट, रुग्णालयात जाऊन प्रकृतीची केली विचारपूस