Supriya Sule | …म्हणून देवेंद्र फडणवीसांची तक्रार सुप्रिया सुळे आता थेट अमित शाह यांच्याकडे करणार

Supriya Sule : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar Crime) भाजप आमदार (BJP) गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून गोळीबार करण्यात आलाय. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार झाला. त्यानंकर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

उल्हासनगर मधील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यात वाद झाला. यानंतर आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत महेश गायकवाड जखमी झाले आहेत त्यांना ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या प्रकरणी आता राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संताप व्यक्त करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तात्कळा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी या घटनेचा निषेध करते. राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.अशी मागणी त्यांनी केली.

आपण कुठेही गोळी चालवू शकतो, असं त्यांना वाटत असेल तर हे गुंडाराज नाही तर काय? असा उद्विग्न सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. त्यांच्या आपापसातली जी काही भांडणे असतील ती त्यांनी सोडवावीत. यामध्ये महाराष्ट्रातील सामान्य माणूस भरडला जात आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राज्याच्या गृहमंत्र्यांचे काहीही नियंत्रण उरले नाही. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. मी ही बाब केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कानावर टाकणार आहे. याबाबत आज ट्विट करणार आहेच. त्याशिवाय अधिवेशनादरम्यान अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे शहरात मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना यांना निवेदन देणार – गोऱ्हे

Rishabh Pant | ‘खोलीत जाऊन खूप रडायचो…’, धोनीशी होणाऱ्या तुलनेवर ऋषभ पंतचा धक्कादायक खुलासा

ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे