“तर मी दोन लाथा मारल्या असत्या”, सर्व्हेत जात विचारल्याने अभिनेता पुष्कर जोग भडकला!

Pushkar Jog: मराठी अभिनेता पुष्कर जोग हा सध्या त्याच्या मुसाफिरा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना एका वेगळ्याच कारणामुळे अभिनेता चर्चेचा विषय बनला आहे. पुष्करची सोशल मीडिया पोस्ट यामागचे कारण बनली आहे.

पुष्करनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, “काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय म्हणून माझी जात (Pushkar Jog Cast) विचारत होते. त्या कर्मचारी जर बाई माणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या…कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार” पुष्करच्या या पोस्टवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कार विमा खरेदी करण्यापूर्वी ‘या’ 3 गोष्टी नक्की जाणून घ्या, तुम्हाला होईल फायदा!

कोण होते डॉ. नित्या आनंद, ज्यांनी पहिली गर्भनिरोधक गोळी तयार केली; वयाच्या ९९व्या वर्षी झाले निधन

हैदराबाद कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव, इंग्लंडविरुद्ध दोन्ही डावात सर्वबाद झाली टीम