भारतीय अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरतेय- Shaktikanta Das

Shaktikanta Das : देशातील सध्याचा महागाईचा दर आहे तसाच स्थिर आणि तुलनेनं कमी राहिला तर शाश्वत आर्थीक विकासासाठी ते उपयुक्त ठरेल, असं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी म्हटलं आहे. काल मुंबईमध्ये 59 व्या दक्षिण पूर्व आशियायी मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्ससाठी आयोजित परिषदेमध्ये ते बोलत होते.

अन्नधान्यांच्या, खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये सातत्यानं होणारे चढउतार, बदलती भूराजकीय परिस्थिती यांनी महागाई विरुद्धच्या लढ्यात धोरणकर्त्यांसमोर नवी आव्हानं उभी केली आहेत, असं दास यांनी म्हटलं आहे. मात्र, भारतानं अशा बिकट परिस्थितीतून अनेक आव्हानाना सामोरे जात मार्ग काढला असून आता ती सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे, असं दास यांनी नमूद केलं.

2024-25 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर 7 टक्के राहील. कठोर आणि काटेकोर आर्थिक धोरणांमुळेच भारतीय अर्थव्यवस्थेला प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढणं शक्य झालं, असंही दास यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी अजितदादांचीच, शरद पवार यांना मोठा धक्का

Jagdish Mulik | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी जगदीश मुळीकांच्या उमेदवारीची शक्यता वाढली

Surya Ghar Yojana | मोफत वीज योजनेसाठी नोंदणी झाली सुरू, असा करू शकता अर्ज