तू तुझ्या द्वेषाची पोळी भाजून घेऊ नकोस; जात विचारल्याने चिडलेल्या पुष्कर जोगला किरण मानेंनी सुनावलं

Pushkar Jog: मराठी अभिनेता पुष्कर जोग याने आपल्याला आपली जात विचारणाऱ्या बीएमसी कर्मचाऱ्यावर टीका करताना अपशब्द वापरले. पुन्हा मला जात विचारू नका अन्यथा कानाखाली पडेल, असे धडधडीत विधान त्याने केले. आता यावर मराठी अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी पुष्कर जोगला खुले आवाहन करत टीकास्त्र सोडले आहे.

काय म्हणाला होता पुष्कर?
पुष्करनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, “काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय म्हणून माझी जात (Pushkar Jog Cast) विचारत होते. त्या कर्मचारी जर बाई माणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या…कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार” पुष्करच्या या पोस्टवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

काय आहे किरण मानेंची पोस्ट?
पुष्कर जोग नावाच्या, सिनेमात वगैरे काम करणार्‍यानं विधान केलं, “जातगणना करायला आलेली बाई नसती तर मी दोन लाथा घातल्या असत्या.” अरे भावा, ते सरकारनं दिलेल्या आदेशामुळं तुझ्या घरी आलेले साधे कर्मचारी होते रे ते. त्यांना हौस नाही तुमचे उंबरठे झिजवायचे.

तुला लाथाच घालायच्यात ना? लै राग आलाय का तुला जात विचारल्याचा? मी तुला चॅलेंज देतो- ज्याने हा जात गणनेचा आदेश सोडलाय त्या नेत्याला लाथा घाल. चल, खुल्लं आव्हान आहे माझं. तू जर त्या जात गणनेचा आदेश देणार्‍या सत्ताधारी नेत्याला लाथा नाही घातल्यास तर तू त्या कर्मचार्‍याकडून चार लाथा खायच्या. बोल. मराठ्यांच्या आणि ओबीसींच्या लढ्यात तू तुझ्या द्वेषाची पोळी भाजून घेऊ नकोस. बहुजन शांत आहेत म्हणून मस्तीत विधानं करणं लै महागात पडेल. मापात रहा. असं बरंच काही लिहित किरण माने यांनी पुष्कर जोग याला चॅलेंज दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कार विमा खरेदी करण्यापूर्वी ‘या’ 3 गोष्टी नक्की जाणून घ्या, तुम्हाला होईल फायदा!

कोण होते डॉ. नित्या आनंद, ज्यांनी पहिली गर्भनिरोधक गोळी तयार केली; वयाच्या ९९व्या वर्षी झाले निधन

हैदराबाद कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव, इंग्लंडविरुद्ध दोन्ही डावात सर्वबाद झाली टीम