Loksabha ELection | ‘आम्ही जनतेची हृदयापासून कामे केली आहेत; मात्र तुम्ही काय काम केले हे तुम्हालाच शोधावे लागतेय’

Loksabha ELection | ज्यांना ३० वर्षे या मतदारसंघात सेवा करण्याची संधी दिलात त्यांची भाषा घसरली आहे… टिका करा परंतु सिध्दांतावर करा… भाषा घसरलेली टिका नको…अनंत गीते तुम्ही तुमच्या निष्क्रियतेमुळे  पराभूत झालात… आम्ही आमच्या कामाची यादी तोंडपाठ सांगू शकतो… आम्हाला कामाच्या यादीचा कागद हातात घ्यावा लागत नाही कारण आम्ही जनतेची हृदयापासून कामे केली आहेत… मात्र तुम्ही काय काम केले हे तुम्हालाच शोधावे लागते आहे अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा (Loksabha ELection) मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी श्रृंगारतळी येथील महायुतीच्या जाहीर सभेत केली.

आठ वर्षे भाजपच्या सहकार्याने अनंत गीते तुम्ही या मतदारसंघात निवडणूक लढलात हे सोयीस्करपणे विसरलात. पावसाळा आला की ‘डराव डराव’ चा आवाज आपल्याला ठिकठिकाणी ऐकायला मिळतो तसा अनंत गीते फिरायला लागले की निवडणूक आली हे समजायचे असा उपरोधिक टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला.

देशाला लोकशाहीच्या माध्यमातून स्थिर सरकार हवे आहे आणि ते २०१४ पासून या देशात एनडीएरुपाने बघायला मिळत आहे. आताही ४०० पार आकडा गाठायचा आहे. अनंत गीते तुम्ही कधी काळी ज्या भाजपच्या सहकार्याने निवडून येत होता तेव्हा तुम्हाला लोकशाही धोक्यात आहे हे जाणवत नव्हते मात्र आता लोकशाही धोक्यात आणि ईव्हीएमवर संशय व्यक्त करत आहात यावर सुनिल तटकरे यांनी आपल्या भाषणात तीव्र आक्षेप व्यक्त केला.

२०१४ मध्ये पंतप्रधान पदासाठी भाजपने नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर केले आणि देशाला कलाटणी मिळाली. मोदी नावाची लाट देशात आपल्याला पहायला मिळाली हे विसरता कामा नये असेही सुनिल तटकरे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगाच्या पाठीवर भारताने गौरवशाली स्थान मिळवले आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील तरुण रोजगाराच्या माध्यमातून आपल्या मातीशी जोडला कसा जाईल यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे सुनिल तटकरे यावेळी म्हणाले.

आपण सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी एकत्र आलो आहोत. जनतेच्या हितासाठी सत्तेत सहभागी झाले पाहिजे हे विचार घेऊन आम्ही सत्तेत सहभागी झालो असे सांगतानाच ज्या मतदारसंघाने मला ताकद आणि आपल्या हदयात महत्वपूर्ण स्थान दिले त्यांच्यासाठी सदैव काम करायचे असल्याचा ठाम विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

दिर्घकाळ रेंगाळलेल्या मुंबई – गोवा महामार्गाच्या कामाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणाला खरा न्याय दिला आहे. याशिवाय कोकणाचे भवितव्य बदलणारा अटलसेतूही पूर्ण झाला आहे. या सर्व कामांबाबत सुनिल तटकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

येत्या काळात महायुतीचा खासदार म्हणून काम करताना भारत सरकारच्या ज्या ज्या योजना असतील त्या मतदारसंघात राबवणार असून गुहागरचा विधानसभा मतदारसंघ इतर विधानसभा मतदारसंघापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून देईल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

या सभेत भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू, माजी आमदार मधु चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण आदींनी आपले विचार मांडले. रायगड लोकसभा मतदारसंघातील गुहागर विधानसभा मतदारसंघात श्रृंगारतळी येथे महायुतीची जाहीर सभा आज पार पडली.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे, भाजप नेते माजी आमदार विनय नातू, भाजपाचे माजी आमदार मधु चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, राष्ट्रवादी युवक सरचिटणीस सादिल आरेकर, शिवसेना महिला अध्यक्षा रश्मी गोखले, शिवसेना तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol: “बोलायला गेलो तर खुप काही निघेल, परंतु…,” सुप्रिया सुळेंना मोहोळांनी दिलं प्रत्युत्तर

मोदीजींची गॅरेंटी म्हणजे, गॅरेंटी पूर्ण होण्याची गॅरेंटी! भाजपाच्या संकल्पपत्रावर मुरलीअण्णांची प्रतिक्रिया

Sharad Pawar: आश्वासनाची पूर्तता न करणे हे भाजपचे वैशिष्ट्य, शरद पवारांचा घणाघात