राहुल गांधी आहेत ‘या’ हॉट अभिनेत्रीचे आवडते नेते; ते देशाचे नेतृत्व करतील असाही वाटतोय तिला विश्वास

मुंबईतील एका सार्वजनिक कार्यक्रमात तिने हे वक्तव्य केले

मुंबई – मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिने भारतीय आता कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याबाबत केलेले एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. राहुल गांधी हे पुनमचे आवडते राजकारणी असून भविष्यात ते देशाचे नेतृत्व करतील अशी अपेक्षा तीने व्यक्त केली आहे. मुंबईतील एका सार्वजनिक कार्यक्रमात तिने हे वक्तव्य केले आहे.

पुढे ती म्हणाली, मी क्रिकेटची क्रेझी फॅन आहे आणि जर भारतीय संघाने 2023 चा विश्वचषक जिंकला तर मी पृथ्वीवरील सर्वात आनंदी व्यक्ती असेल.पूनम पुढे म्हणाली की, ती क्रिकेटर कपिल देव यांच्या जीवनावर आधारित 83 हा चित्रपट पाहण्यास उत्सुक होती, मात्र माझ्या व्यस्त वेळापत्रकामुळे माझ्याकडे वेळ मिळाला नाही.

अभिनेत्रीने सांगितले की, ‘मी शॉर्ट फिल्म्स, वेब सीरिज आणि यूट्यूब चॅनलच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. २०२२ हे वर्ष सर्वांसाठी आनंदाचे व्हावे अशी माझी इच्छा आहे. पूनम पांडे अलीकडे तिच्या लूकमुळे सोशल मीडियावर खूप ट्रोल झाली होती. यावर अभिनेत्री म्हणते की तिला त्याची पर्वा नाही.