दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन मालदीवला न जाता लक्षद्वीपला जाणार; मालदीवचे दिवस फिरले

Nagarjuna Cancelled Maldives Trip : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यातील राजनैतिक वादाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधानांच्या लक्षद्वीप दौऱ्याशी संबंधित काही छायाचित्रे सोशल मीडियावर समोर आली होती, ज्यावर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. याबाबत भारताने कठोर भूमिका घेतली आहे.

सोशल मीडियावरही भारतीय वापरकर्त्यांनी केवळ हा मुद्दाच काढला नाही तर मालदीवला जाण्याऐवजी लक्षद्वीपमध्ये सुट्टी घालवण्याचे आवाहन केले. यामुळेच अनेकांनी मालदीवच्या नियोजित सहली रद्द केल्या. यातच आता दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन (Nagarjuna) सध्या चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मालदीवला (Maldives) न जाता लक्षद्वीपला (Lakshadweep) जाण्याचा निर्णय घेतला.

नागार्जुनने सुट्टीसाठी मालदीवला जाण्याचा निर्णय घेतला होता. पण मोदींच्या दौऱ्यानंतर त्याने त्याचा निर्णय बदलला. संगीतकार एमएम किरावनीसोबत बोलताना नागार्जुनने लक्षद्वीपबद्दल भाष्य केलं आहे. तो म्हणाला, पुढच्या आठवड्यातच तो लक्षद्वीपला जाईल. मालदीवचा वाद सुरू नसताना मी अनेकदा तिथे गेलो आहे. पण आता नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपची वेगळी ओळख करुन दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

New EV Policy: आता होणार खरा धमाका; भारतासाठी टेस्लाचा 30 अब्ज डॉलर्सचा मेगा प्लान

‘मी मृतदेह पिशवीत नेला, पण मी मुलाची हत्या केली नाही’, सूचना सेठचा दावा

संजय राऊतांची 3 इंद्रिये निकामी झाले आहेत; अमोल मिटकरी यांची खोचक टीका