राहुल गांधींचा मैत्रिणीसोबतचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

नवी दिल्ली- परदेश दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नाईट क्लबमधील व्हिडिओ (Rahul Gandhi’s nightclub video) सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत राहुल गांधी हे आपल्या मैत्रिणीसोबत नाइट क्लबमध्ये दिसत आहेत.राहुल गांधी यांचा काठमांडू येथील नाईट क्लबमधील व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाने पुन्हा एकदा राहुल गांधींना घेरलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळची राजधानी असणाऱ्या काठमांडूमध्ये हा नाईट क्लब आहे. हा तेथील प्रसिद्ध क्लब (nightclub ) आहे. राहुल गांधी आपल्या पत्रकार मैत्रिणीच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी सोमवारी नेपाळमध्ये पोहोचले होते. राहुल गांधींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल गांधी यांच्यासोबत असणारी महिला ही सुमनिमा उदास (Sumanima udas) असल्याचे सांगितलं जात आहे.

राहुल गांधी यांच्यासोबत असणारी महिला ही चीनची नेपाळमधील राजदूत असल्याचा दावा काहींनी केला आहे. तर, ही महिला राहुल गांधी यांची महाविद्यालयीन जीवनातील मैत्रिण असल्याचे दावा एका फोटोच्या आधारे केला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांची खडाजंगी होण्याची शक्यता आहे.