राज ठाकरेंनी सभेत सगळ्या नियमांचे उल्लंघन केले, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा – जलील 

औरंगाबाद  –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे  ( Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray ) यांची बहुचर्चित सभा नुकतीच पार पडली. आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याने अवघ्या देशाचे लक्ष राज ठाकरे यांनी स्वतःकडे वेधून घेतले असताना आज राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे  सर्वांचे लक्ष होते. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर जातीयवादाचा आरोप करत आपल्या खास शैलीत समाचार घेतला. सोबतच भोंग्यांच्या मुद्द्यावर भाष्य करत 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही.  4 मे नंतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी सभेत सगळ्या नियमांचे उल्लंघन केले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी एमआयएम पक्षाचे नेते खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel on Raj Thackeray ) यांनी केली आहे. तरुणांना भरकटवण्याचे काम सुरू आहे. धार्मिक तेढ वाढवणे सुरू आहे. भोंगे काढण्याची मुदत एक दिवसाने वाढली. म्हणजे ते म्हणतात कार्यकर्त्यांनो तुम्ही करा आणि मी अयोध्येला जातो, म्हणजे केसेस कार्यकर्त्यांवर. ते मरणार हे फिरणार, अशी टीका जलील यांनी केली.

हा देश आमचा आहे आणि आम्ही सगळे सोबत राहू, सुप्रीम कोर्टाने भोंगे काढायला सांगितले नाही. कोर्ट म्हणाले डेसिबलचा नियम पाळा. आता एकदा होऊन जाऊ द्या याचा अर्थ काय? बाबरी पुन्हा का आली? बाबरी मुस्लीम समाजाने स्वीकारली ना, मग पुन्हा मुद्दा कशाला? मुस्लीम विषय काढून यांना राजकारण करायचे आहे. यातून ते मोठे व्हायचे स्वप्न पाहत आहे, असे खासदार जलील यांनी सांगितले.