राजसाहेब लवकर बरे व्हा, फडणवीस साहेब एकटे पडतील…भोंगा अजुन अर्धवट आहे; सय्यद यांचे खोचक ट्वीट

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात आज शस्त्रक्रिया (surgery) होत आहे.  जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे हे शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. पण तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये कोरोनाच्या डेड सेल्स आढळून आल्याने त्यांच्यावरील शस्त्रक्रिया थांबविण्यात आली होती.

राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं असून त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया (Hip bone surgery) करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत दिली होती. दरम्यान, एका बाजूला राज ठाकरे यांच्या उत्तम आरोग्यासाठी अनेकजण प्रार्थना करत असताना शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Deepali Syed) यांनी एक ट्वीट केले असून याची सध्या बरीच चारच होताना दिसत आहे.

माननीय राजसाहेब आपण लवकरात लवकर बरे व्हा नाहीतर विधान परिषद निवडणुकी (Legislative Council elections) नंतर फडणवीस साहेब एकटे पडतील. भोंगा अजुन अर्धवट आहे. असं खोचक ट्वीट सय्यद यांनी केलं आहे. या ट्वीटवर अनेकांनी नाराजी दर्शविली आहे.