Ajay Maharaj Baraskar | जरागेंविरोधात बोलणाऱ्या अजय महाराज बारस्करांवर हल्ल्याचा प्रयत्न 

Attempted attack on Ajay Maharaj Barskar : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर आरोप करणारे अजय बारस्कर महाराज यांच्याविरुद्ध सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.  यातच आता  मनोज जरागेंविरोधात बोलणाऱ्या अजय महाराज बारस्करांवर हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे. मुंबईतील चर्चगेट परिसरात त्यांच्यावर मराठा आंदोलकांनी हल्ल्याच्या प्रयत्न केला.

मनोज जरांगे यांच्यावर आरोप करणारे बारस्कर (Ajay Maharaj Barskar) गेल्या काही दिवसांपासून मुंबईतच वास्तव्याला आहेत. विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती देतायेत. आज रात्री साडे आठच्या सुमारास चर्चगेट परिसरातून बारस्कर प्रवास करत असताना काही लोकांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला, अशी माहिती स्वत: बारस्कर यांनी दिली.

हल्ल्यानंतर जवळच असलेल्या पोलिसांनी हल्लेखोरांना अडवलं आणि ताब्यातही घेतलंय. या सगळ्या घटनेनंतर बारस्कर यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आलेली आहे असं समजतंय. दरम्यान, या हल्ल्यानंतर आता अजय बारस्कर महाराज पुढे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Lok Sabha Elections 2024 | भाजप उमेदवारांची पहिली यादी आठवडाभरात येणार; जाणून घ्या कुणाचा असेल यात समावेश

अजय बारसकरवर महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणाचा दवाब आणला, सरकारने हा ट्रॅप रचला – Manoj Jarange

MNS-BJP Alliance | मनसे-भाजप युती जवळपास निश्चित, लोकसभेच्या दोन जागाही ठरल्या?