करुणा शर्मा-मुंडेंच्या अडचणी वाढल्या,येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण

पुणे : महिलेच्या पतीला घटस्फोट देण्यासाठी पतीसमवेत संगनमत करुन संबंधित महिलेस जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह करुणा शर्मा विरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २३ वर्षीय तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पती विरोधात कौटुंबिक हिंसाचार, अनैसर्गिक अत्याचार, मारहाण, धमकावणे तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात करूणा शर्मा ( वय ४३, रा. सांताक्रुज, मुंबई) सहआरोपी आहेत. तक्रारदार तरुणी येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर भागात राहायला आहे. तरुणीच्या पतीला घटस्फोट पाहिजे होता. करूणा शर्मा यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगत तो तिच्यावर दबाब टाकत होता. पती आणि करुणा शर्माने घटस्फोट देण्यासाठी दबाब टाकल्याचे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

पीडितेचा पती अजय कुमार देडेने आपल्यावरअनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले आणि मानसिक, शारीरिक त्रास दिला, असा आरोपी पीडितमहिलेनं केलाय. मी करुणासोबत लग्न करणार आहे, तू मला घटस्फोट दे, असं म्हणत पीडितेच्यापतीनं तिला माहेर नेऊन सोडल्याचाही आरोप करण्यात आला आहे.तक्रारदार पीडित महिला ही पतीच्या शोध मुंबईत आली होती. मुंबईतील सांताक्रझ येथील ग्रीनइमारतीत पीडित पिहाल 3 जून रोजी गेली होती, अशी माहिती मिळतेय.  यानंतर करुणा शर्मा यांनी महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून पतीला घटस्फोट दे नाहीतर जीवे मारीन अशी धमकी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव करत आहेत.