लोकशाही टिकवण्यासाठी तरुणांनी राजकारणात यावे, राजू शेट्टी यांचे आवाहन

Raju Shetty : सध्याच्या राजकारणामध्ये निष्ठा आणि विचारांना अर्थ राहिलेला नाही. गुंडगिरी आणि भ्रष्टाचार वाढीला लागला आहे. यामुळे राजकारणापासून दूर राहणाऱ्या तरुणांनी देशात लोकशाही टिकवण्यासाठी राजकारणात यावे, असे आवाहन करतानाच सुशिक्षित तरुण राजकारणात आला तर देशाला निश्चितच समर्थ नेतृत्व मिळू शकेल असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty)यांनी व्यक्त केला.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित ७ व्या युवा संसदेचे उद्घाटन न-हे येथील संस्थेच्या सभागृहात झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष व युवा संसदेचे अध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर उपस्थित होते. खासदार संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांना आदर्श खासदार पुरस्कार, माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार, सरपंच दिलीप घोलप यांना आदर्श सरपंच पुरस्कार तर उद्योजक सनी निम्हण यांना आदर्श युवक पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. पुणेरी पगडी, शाल, मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. या संस्थेच्या ‘उडान’ यावार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

राजू शेट्टी (Raju Shetty) म्हणाले, तरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी आपण राजकारणात कशासाठी येणार आहोत, हे उद्दिष्ट निश्चित करावे. राजकारण म्हणजे केवळ पैसा प्रसिद्धी सत्ता मिळवण्याचे साधन नाही तर ते समाजाची सेवा करण्याची एक संधी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. राजकारण जर सकारात्मकतेने केले तर जनता निश्चितच आपल्या पाठीशी उभे राहते ही मी वैयक्तिक अनुभवातून आपल्याला सांगतो. राजकारणामध्ये अनेक समस्या असल्या तरी या देशाला हुकूमशाहीपेक्षा लोकशाहीच पुढे नेऊ शकते. त्यामुळे या देशातील लोकशाही टिकवण्यासाठी तरुणांनी राजकारणात आले पाहिजे.

महत्वाच्या बातम्या

गंगावेस तालीम देशातील दर्जेदार तालीम बनवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

ओबीसी समाजामध्ये सध्या भीतीचे वातावरण, ओबीसींच्या मुलांच्या तोंडचा घास हिरावला जातोय – छगन भुजबळ