फुटून गेलेल्या आमदारांपैकी अनेक जण संपर्कात आहेत पण पवार साहेब…; जयंत पाटील यांचा मोठा खुलासा

NCP – राष्ट्रवादी काँग्रेसचे गेल्या अनेक वर्षांपासून ज्या मतदारसंघात निवडणूक लढत आहे. तसेच ज्या मतदारसंघांमध्ये निवडून आलेले आहे. त्या मतदारसंघाचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय आढावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत आज घेण्यात आला आहे. कोल्हापूर, जळगाव, पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्य़ात लोकसभा मतदारसंघाचा आढावा आज घेण्यात आला. उद्या उर्वरित जिल्ह्य़ातील आढावा घेतला जाईल असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अत्यंत चांगली परिस्थिती आहे. सर्व मतदारसंघातून सर्व कार्यकर्त्यांकडून वेगवेगळी नावे सुचवली जात आहेत. अनेक जण इच्छुक आहे. त्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही मात्र या संदर्भात चर्चा करून निर्णय घेतले जाईल.

पुढे जयंत पाटील म्हणतात की, राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या आमदारांपैकी अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. त्या आमदारांची पुन्हा राष्ट्रवादीत येण्याची इच्छा आहे. पण याबाबतचा अंतिम निर्णय शरद पवार साहेब घेतील, असंही जयंत पाटील म्हणाले. पक्ष आणि चिन्ह या संदर्भात अजित पवार गटात गोंधळ आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवणार आहोत. अनेक पक्ष महाविकास आघाडीत येऊ इच्छितात. आम्ही सर्वांना एकत्र घेऊन चर्चा करू आणि जागा वाटपा निर्णय घेऊ असे जयंत पाटील म्हणाले.

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीनिवास पाटील, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री आमदार अनिल देशमुख, माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार अशोक पवार, माजी आमदार कोषाध्यक्ष हेमंत टकले, पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस नसीम सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, अल्पसंख्याक विभाग प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, मुख्य प्रवक्ते महेश तपासे, प्रवक्त्या विद्याताई चव्हाण, अमृत सेलचे अध्यक्ष मकरंद कुलकर्णी, डिजिटल मीडिया रिसर्च अँड कम्युनिकेशन विभागाचे राज्यप्रमुख नीरज महांकाळ तसेच इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

https://youtu.be/tr2tvuJfQq4?si=M8a1sEkkAwwC09hl

महत्वाच्या बातम्या-

सत्य विरुद्ध सत्ता च्या लढाईसाठी राष्ट्रवादी सज्ज; शरद पवारांनी घेतला सात लोकसभा मतदार संघाचा आढावा

ललितने सात किलो चांदी न नेता फक्त पंचवीस लाख रुपयांची रोख रक्कम नेत केले पलायन ?

शरद पवार सुप्रिया सुळे यांना हमासच्या बाजूने लढण्यासाठी गाझाला पाठवतील – सरमा