‘राष्ट्रीय समाज पक्ष हेमंत रासने यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा राहून त्यांना भरगोस मतांनी विजयी करणार’

पुणे : भारतीय जनता पक्ष+बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) + आर.पी.आय.+ शिवसंग्राम पक्ष+रा.स.प. महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आज राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी पत्रकार परिषद घेऊन रा स प महायुतीच्या दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावणार असल्याचे सांगितले

या वेळी बोलताना जानकर म्हणाले की ‘स्व गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून रा स पा ची भारतीय जनता पक्षाबरोबर युती आहे त्यामुळे या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची पूर्ण टीम कामाला लागली आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांशी समन्वय करून इथल्या प्रत्येक कामात सहभाग घेत आहोत तसेच चिंचवड पोटनिवडणुकीत सुद्धा आमचे कार्यकर्ते घराघरात जाऊन प्रचार करत आहेत मला विश्वास आहे की दोन्ही निवडणुकीत महायुतीचेच उमेदवार विजयी होतील.

या पत्रकार परिषदेला बाळासाहेबांच्या शिवसेनेचे राज्य संपर्कप्रमुख अजय भोसले रा स पा चे शहराध्यक्ष बालाजी पवार ,भा ज पा चे राज्य प्रवक्ते संदीप खर्डेकर, शहर प्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर,दादासाहेब रुपनार आदी उपस्थित होते.