TMKOC: ‘अय्यर’ला मिळाली त्याची खऱ्या आयुष्यातील ‘बबीता’! तनुज महाशब्दे लवकरच करतोय लग्न

Mumbai: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Tarak Mehta Ka Ooltah Chashma) या टीव्ही सीरियलला भारतातून भरपूर प्रेम मिळालं आहे. वर्षानुवर्षांपासून सुरू असलेल्या या सीरियलला आणि त्यातील सर्व पात्रांना चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. अगदी या सीरियलमधील सर्व पात्रांना खऱ्या आयुष्यातही त्यांचे चाहते ऑन स्क्रिनवरील नावांनी हाक मारताना दिसतात. यापैकीच एक पात्र म्हणजे, ‘कृष्णन अय्यर’ (‘Krishnan Iyer’) अर्थात ‘अय्यर भाई’चे. अय्यर आणि त्याची ऑन स्क्रिन पत्नी बबीता जी यांचा वेगळाच चाहतावर्ग आहे.

टीव्हीवर जरी अय्यरचे पात्र विवाहित असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र अय्यरचे अजूनही लग्न झालेले नाही. मात्र आता वयाच्या ४२व्या वर्षी अखेर अय्यरने बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला आहे. अय्यर अर्थातच तनुज महाशब्दे (Tanuj Mahashabde) लवकरच त्याच्या प्रेयसीसोबत लग्न करणार आहे.

तारक मेहता.. सीरियलमध्ये ‘कृष्णन सुब्रमण्यम अय्यर’ म्हणून ओळखला जाणारा तनुज २०२३ ची सुरुवात लग्नबंधनात (Tanuj Mahashabde Marriage) अडकू शकतो. यापूर्वी बऱ्याचदा तनुज मुनमुन दत्तासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. परंतु दोघांनीही ही अफवा असल्याचे सांगत या चर्चांवर पूर्णविराम लावला. अय्यर खऱ्या आयुष्यात दुसऱ्याच मुलीला डेट करत असून तीच त्याची होणारी पत्नीही आहे, असे म्हटले जात आहे. अय्यरची होणारी पत्नी ही मुनमुन दत्तापेक्षाही जास्त सुंदर असल्याचे म्हटले जात आहे. असे असले तरीही, अद्याप तनुजच्या होणाऱ्या पत्नीचे नाव किंवा तिचा चेहरा समोर आलेला नाही.