प. महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा मातब्बर नेता आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये जाणार ?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) घुसमट होत असल्याने राष्ट्रवादीचा प. महाराष्ट्रातील एक बडा नेता भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. येत्या दोन ऑगस्ट रोजी माजी आमदार राहिलेला हा नेता आपल्या संपूर्ण गटासह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे या घडामोडींकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांचे बारीक लक्ष आहे. प. महाराष्ट्रातील या एकनिष्ठ असणाऱ्या नेत्याची पक्षातच कोंडी झाली, या सर्व गोष्टी वरिष्ठांपर्यंत पोचल्या आहेत, परंतु त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. वरिष्ठांनी बघ्याची भूमिका घेणे म्हणजे अप्रत्यक्ष पक्षांतर्गत असणाऱ्या विरोधकांना बळ देण्याची भूमिका असल्याची चर्चा आहे.