पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करुन जनतेला दिलासा द्या; काँग्रेस नेत्याचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई – केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई प्रचंड वाढली असून सामान्य जनतेला या महागाईने जगणे मुश्कील झाले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सर्वच सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पंजाब व राजस्थान सरकारने ज्या पद्धतीने पेट्रोल डिझेलच्या करामध्ये कपात करून जनतेला दिलासा दिला त्याचपद्धतीने आपल्या राज्यातील जनतेच्या हितासासाठी पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून दिलासा द्यावी, अशी मागणी माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नसीम खान म्हणतात, केंद्र सरकारने मागील सात वर्षात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून १०० रुपये प्रति लिटर रुपयांच्यावर गेले आहेत. एलपीजी गॅसही ९०० रुपये झाला आहे. मोदी सरकारने सातत्याने केलेल्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या महागाईमुळे वाहतुकीचा खर्च वाढून इतर वस्तुंच्या किमती वाढतात, प्रवासाचा खर्चही वाढतो. कोरोनामुळे आधीच लोकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून त्यांच्यासमोर अनेक समस्या उभ्या ठाकलेल्या आहेत. या दुष्टचक्रात सामान्य जनता भरडली जात असून त्यांचे जगणे कठीण झाले आहे.

पेट्रोल डिझेलवरील कररुपाने राज्याला मिळणारा पैसा केंद्र सरकार वेळेवर देत नाही, त्यातच सेसच्या पैशातील हिस्सा राज्यांना मिळतच नाही तो फक्त केंद्र सरकारलाच मिळतो. यातून राज्याची आर्थिक कोंडी होत आहे परंतु जनतेला दिलासा देणे आपले कर्तव्य आहे. राज्यातील जनतेच्या हितासासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून आपण पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करून दिलासा द्यावा, असे नसीम खान म्हणाले.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post
Congress

प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया विभाग राज्य अध्यक्षपदी विशाल मुत्तेमवार यांची नियुक्ती

Next Post

ग्रामपंचायत पोट निवडणूकीचा कार्यक्रम अखेर जाहीर

Related Posts
'मोदी भक्त' मनोज मुंतशीर बरळला; म्हणाला, 'हनुमान देव नव्हते, राम भक्त होते, त्यांना...'

‘मोदी भक्त’ मनोज मुंतशीर बरळला; म्हणाला, ‘हनुमान देव नव्हते, राम भक्त होते, त्यांना…’

Adipurush : ‘आदिपुरुष’चे संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) या चित्रपटासाठी लिहिलेल्या संवादांमुळे आधीच लोकांच्या धारेवर आहे. आणि…
Read More

एम फक्टो मार्फत प्राध्यापकांचे धरणे आंदोलन

महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी ॲण्ड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन (एम फक्टो) यांच्यामार्फत सोमवार, दिनांक 18 जुलै 2022 रोजी मा.…
Read More
युगेंद्र पवार विजयी होतील याचा १०० टक्के विश्वास - Shrinivas Pawar

युगेंद्र पवार विजयी होतील याचा १०० टक्के विश्वास – Shrinivas Pawar

Yugendra Pawar | राज्यात एकाच टप्प्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष…
Read More