रामनवमीला भगवान श्रीरामांच्या ‘या’ 5 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील प्रत्येक अडचण होईल दूर!

चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचागानुसार अत्यंत महत्वाचा दिवस. हा दिवस आपण मोठ्या आनंदाने व उत्साहाने रामनवमी म्हणून साजरा करतो. या तिथीला भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता. या दिवसाला ‘रामनवमी’ असे म्हणतात. यंदा ३० मार्च २०२३ रोजी रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात येईल. ज्याप्रमाणे कृष्णाचा जन्म रात्री १२ वाजता झाला असे म्हणतात तसेच प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी १२ वाजता झाला. असे म्हणतात की, रामनवमी दिवशी काही खास मंत्रांचा जप केल्याने भगवान श्रीराम प्रसन्न होतात. कोणते आहेत ते मंत्र पाहूया…

क्लीं राम क्लीं राम – जर तुम्हाला अदृश्य शक्तींच्या भीतीपासून मुक्ती मिळवायची असेल तर रामनवमीला श्री रामांच्या या मंत्राचा जप करा. असे म्हणतात की यामुळे सर्व प्रकारच्या वाईट शक्तींचा नाश होतो.

ऊं रामाय हुं फट् स्वाहा – रामनवमीला हवन करताना या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. असे मानले जाते की यामुळे कुटुंबात सुख-शांती नांदते. संकटे नाहीशी होतात.

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे । सहस्त्र नाम तत्तुन्यं राम नाम वरानने – श्रीरामाचा हा मंत्र खूप प्रभावी आहे, धनप्राप्तीच्या इच्छेने या मंत्राचा पाठ केल्यास लवकर फळ मिळते.

ओम राम ओम राम ओम राम हरी राम हरी राम श्री राम श्री राम – रामनवमीला भगवान रामाच्या या मंत्राचा जप करणार्‍यांना सर्वांगीण यश मिळते.

श्री रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः – जर तुम्ही वैवाहिक जीवनात तणावातून जात असाल तर रामनवमीला भगवान रामाच्या या मंत्राचा जप करा. हे काम पती-पत्नीने मिळून केले पाहिजे. यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा येईल.

श्री रामचंद्राय नमः – नोकरी-व्यवसायात प्रगती थांबली आहे, कामात विरोधक येत असेल तर रामनवमीच्या पूजेत या मंत्राचा जप करत राहा. ते सर्व अडथळे दूर करेल.

(टीप- वरील लेख सामान्य माहितीसाठी आहे. याबाबत प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात. आझाद मराठी याची पुष्टी करत नाही)