लोकसभेच्या सर्व तर विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला पाहिजे – बावनकुळे

Mumbai – पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीसह सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकण्याचा आणि विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा मिळवण्याचा संकल्प करा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (State President of Bharatiya Janata Party Chandrasekhar Bawankule) यांनी गुरुवारी केले. भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात  बावनकुळे बोलत होते.

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, चित्रा वाघ, राज पुरोहित, कृपाशंकर सिंग, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Senior BJP leader and former Uttar Pradesh Governor Ram Naik, Assembly Speaker Rahul Narvekar, Higher and Technical Education Minister Chandrakantada Patil, Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil, Labor Minister Suresh Khade, State Vice President Sunil Karjatkar, Chitra Wagh, Raj Purohit, Kripashankar Singh, State General Secretary Muralidhar Mohol, Chief Spokesperson Keshav Upadhyay) आदी यावेळी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले की , अत्यंत प्रतिकूल काळात हजारो कार्यकर्त्यांनी जनसंघ आणि त्यानंतर भाजपा ची विचारधारा रुजविण्यासाठी प्रयत्न केले. या कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यागावरच आज पक्ष उभा आहे. भारतीय जनता पार्टीची स्थापना करताना अटलबिहारी वाजपेयी यांनी समृद्ध, विकसित, बलशाली भारताचे स्वप्न पाहिले होते. नरेंद्र मोदी यांनी अटलजींनी पाहिलेले सर्वश्रेष्ठ भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. त्यामुळेच भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश बनला आहे.

यापुढील काळात राज्यात पक्ष वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षाने दिलेल्या विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करून मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारची विकास कामे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचविली पाहिजेत. ३ कोटी नवे सदस्य बनविण्याचे अभियान यशस्वी करण्याचा आणि शिवसेना युतीसह लोकसभेच्या सर्व ४८ जागा, विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी स्थापना दिनाच्या निमित्ताने केला पाहिजे, असेही श्री. बावनकुळे यांनी नमूद केले.

यावेळी बावनकुळे यांच्या हस्ते जनसंघापासून काम केलेल्या राम नाईक, मुकुंदराव कुलकर्णी, मधू चव्हाण, कांताताई नलावडे, दिलीप गोडांबे, कर्नल चौधरी, कर्नल देशपांडे, अनंत मराठे, शैला पतंगे – सामंत, दिलीप हजारे, भरत कारंडे, श्रीपाद मुसळे, बाबा कुलकर्णी (Ram Naik, Mukundarao Kulkarni, Madhu Chavan, Kantatai Nalavde, Dilip Godambe, Colonel Chaudhary, Colonel Deshpande, Anant Marathe, Shaila Patange – Samant, Dilip Hazare, Bharat Karande, Shripad Musale, Baba Kulkarni) आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

त्याआधी  बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पक्षाच्या आयुष्मान भारत सेल तर्फे आयोजित आयुष्मान भारत कार्ड वितरण कार्यक्रमाचा प्रारंभही  बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला.