मोठी बातमी : प्रतीक्षा संपली, राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले, निवडणुका जाहीर

Mumbai – निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल मोठी घोषणा करण्यात आली आहे. (The Election Commission has made a big announcement about the elections in Maharashtra.).राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले असून निवडणूक होणाऱ्या ठिकाणी आजपासूनच आचार संहिता जारी करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रमही जाहीर केला आहे.

आयोगाकडून गावगाडा चालवणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या आहेत.राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवणुकांसाठी ही निवडणूक होणार आहे.

निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होणार आहे. 18 मे 2023 रोजी या निवडणुकीसाठी मतदान पार पडेल.गेल्या काही काळापासून राज्यातील राजकारणाचे पडसाद गाव स्तरावर देखील पहायला मिळत आहेत. त्यामुळे आताच्या निवडणुकीत देखील मोठी रस्सीखेच पहायला मिळू शकते.