CID फेम अभिनेत्रीवर कुटुबियांकडूनच अत्याचार, शरीरावरील जखमा दाखवत मागितली मदत

CID Fame Actress Vaishnavi Dhanraj: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो सीआयडी फेम अभिनेत्री वैष्णवी धनराजचे नाव अचानक चर्चेचा भाग बनले आहे. त्यामागचे कारण खूप मोठे आहे. वास्तविक, वैष्णवी धनराजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून वैष्णवी सर्वांकडे मदतीची याचना करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ही अभिनेत्री पोलीस ठाण्यात हजर असल्याचेही दिसून येते.

याशिवाय व्हिडिओमध्ये वैष्णवी धनराजही तिच्या चेहऱ्यावर आणि हातावर झालेल्या जखमांकडे बोट दाखवताना दिसत आहे. एवढेच नाही तर घरच्यांनी मारहाण केल्याचे वैष्णवी धनराजचे म्हणणे आहे. अभिनेत्री कौटुंबिक हिंसाचारामुळे झालेल्या जखमा सर्वांना दाखवते आणि मदतीसाठी सर्वांना आवाहन करते. आपली कहाणी सांगितल्यानंतर अभिनेत्रीने व्हिडिओ थांबवला.

एका रिपोर्टनुसार, वैष्णवी धनराजला तिचा भाऊ, वहिनी आणि तिची आई गेल्या अनेक वर्षांपासून सतत त्रास देत आहे. असे तिच्यासोबत पहिल्यांदा घडले नसल्याचे अभिनेत्रीचे म्हणणे आहे. याआधीही ती तिच्या कुटुंबीयांकडून हिंसाचाराला बळी पडली होती. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिच्या कुटुंबाला तिचं आयुष्य त्यांच्या मनाप्रमाणे चालवायचं आहे. तिला तिच्या कुटुंबीयांकडून जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत.

मात्र, पोलिसांनी अभिनेत्रीच्या तक्रारीची नोंद घेतल्याचे समजते. पोलीस न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत आहेत. त्यानंतर ती कुटुंब आणि आईवर काही कारवाई करेल. CID व्यतिरिक्त वैष्णवी धनराज ‘तेरे इश्क में घायाल’ आणि ‘बेपन्ना’ सारख्या मालिकांमध्ये देखील दिसली आहे.

महत्वाच्या बातम्या-

सर्व महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप करून काही अर्थ नाही, समंजसपणे हा प्रश्न मार्गी लावा- जयंत पाटलांचे आवाहन

वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार; उपमुख्यमंत्री पवारांची ग्वाही