सर्वधर्मीयांच्या मूल्यांचा आदर हा बाबूश यांचा आदर्श – जोशुआ

म्हापशातील नागरिकांकडून बाबूश यांच्या आठवणींना उजाळा

म्हापसा : म्हापसेकर नागरिकांचे मार्गदर्शन आणि सहकार्याने आम्ही वाटचाल करीत आहोत. त्यामुळे ‘घर टू घर’ संपर्क अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे माझ्या लोकांसाठी काम करण्याकरिता आणखी सकारात्मक उर्जा मिळत आहे, अशा भावना जोशुआ पीटर डिसोझा यांनी व्यक्त केल्या.

म्हापसा विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार जोशुआ पीटर डिसोझा यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. ‘घर टू घर’ जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. या अभियानाला म्हापसेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

म्हापसा महापालिका क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक १ मधून ‘घर टू घर’ अभियानाला सुरूवात करण्यात आली. म्हापसेकर नागरिक विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करीत आहेत. म्हापसातील यापूर्वी झालेली विकासकामे आणि आगामी काळात काय करता येईल? अशी विधायक चर्चा यानिमित्ताने होत आहे. त्यामुळे आपल्या लोकांसाठी काम करण्याची उर्जा मिळत आहे, असे जोशुआ यांनी म्हटले आहे.

जोशुआ डिसोझा म्हणाले की, ‘घर टू घर’ जनसंपर्क अभियान सुरू असतानाच आम्ही ९० व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रोली देवस्थान मंदिराला भेट दिली आणि आशिर्वाद घेतले. वॉर्ड क्रमांक १ मधील क्रॉस येथे भेट दिली. यावेळी माझ्या म्हापसेकर लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. स्व. बाबूश यांनी आपल्या जीवनात सर्वधर्मीय नागरिकांच्या भावनांचा कायम आदर केला. तीच मूल्ये मी माझ्या जीवनात आत्मसाद केली आहेत. या अभियानात माझे वर्गमित्र भेटले. त्यांनीही या लढाईत सोबत असल्याचा विश्वास दिला.

गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन

दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी तथा महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दौरा केला. म्हापसा मतदार संघातील नागरिक भाजपासोबत आहेत, तसेच जोशुआ निश्चितपणे लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता ठेवतात, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, निवडणूक प्रचार, नागरिकांशी संपर्क आणि पक्षाचा कार्यक्रम याबाबत मार्गदर्शनही केले. यावेळी महाराष्ट्रातील आमदार महेश लांडगे, आमदार राम सातपूते आदी उपस्थित होते.