‘सेक्रेड गेम्स-२’मधील इंटिमेट सीनच्या आधी दिग्दर्शकाने मासिक पाळीची तारिख विचारली; अभिनेत्री अमृता सुभाषचा खुलासा

अभिनेत्री अमृता सुभाष (Amruta Subhash) तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरीज 2’मुळे चर्चेत आहे. कोंकणा सेन शर्माच्या ‘द मिरर’ या शॉर्ट फिल्ममध्ये ती दिसली आहे. अमृताचे तिच्या लस्ट स्टोरीज 2 मधील अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. नुकतेच अमृताने इंटिमेट सीन कॅमेऱ्यात शूट करण्याबद्दल बोलून एक चांगला मुद्दा मांडला. पुरुष आणि महिला दिग्दर्शक असे सीन हाताळण्याच्या पद्धतीत फरक आहे का, हे तिने स्पष्ट केले. अमृताने दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबतच्या तिच्या पहिल्या सेक्स सीनच्या शूटिंगची आठवण सांगितली आणि सांगितले की अशा सीनबद्दल ते खूप संवेदनशील आहेत.

अमृता सुभाषने आठवण करून दिली की, ‘सेक्रेड गेम्स 2’ दरम्यान अनुराग कश्यपने त्यांच्या टीमला कॉल केला आणि अमृताशी तिच्या मासिक पाळीच्या तारखांबद्दल बोलले, जेणेकरून ते तिचे सेक्स सीन अशा वेळी शूट करू शकतील जेव्हा ती आरामदायक असेल.

अमृता सुभाषने ‘नेटफ्लिक्स इंडिया’सोबत बोलताना सांगितले की, ‘मी अनुरागच्या दिग्दर्शनाखाली सेक्रेड गेम्स 2 मध्ये माझा पहिला सेक्स सीन केला होता. ते स्त्री किंवा पुरुषांमध्ये कोणताही मतभेद करत नाहीत. अनुराग कश्यप खूप चांगला आहे. त्याने डायरेक्शन टीमला बोलावले. त्याने मला फक्त एकच प्रश्न विचारला होता की तुझ्या मासिक पाळीच्या तारखा काय आहेत, जेणेकरुन त्यांना शेड्यूल निश्चित करता येईल. मासिक पाळीच्या वेळी मला इंटिमेट सीन करताना बरोबर वाटणार नाही, याची पूर्ण काळजी त्यांनी घेतली होती.’