मेहबूब शेख यांचा पत्ता कट, रोहित पाटील होणार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ?

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्ग्ज नेते आर.आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांचे प्रस्थ राज्यभरात वाढताना दिसत आहे. कवठेमहांकाळ येथील नगरपंचायत निवडणुकीत प्रस्थापित राजकारण्यांना विरोधकांना धूळ चारत अवघ्या 23 वर्षीय रोहित पाटीलने एकहाती सत्ता मिळवली. त्यामुळे आता पक्षात रोहित पाटील यांचे वजन वाढणार हे स्पष्ट झाले आहे.

असं असताना रोहित पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद लवकर मिळण्याची चर्चा सांगलीत जिल्ह्यात सध्या जोरदार सुरू आहे. राष्ट्रवादीचे कर्जत – जामखेडचे आमदार आमदार रोहीत पवार यांनी याबाबत संकेत दिले आहेत.

‘रोहित पाटीलसारखी मुलं विधानसभेत येणं गरजेची आहेत. त्याचं वय कमी असेल त्यामुळे गेल्यावेळी संधी दिली नसेल मात्र वय झालं की पक्ष विचार करेल. पक्ष येत्या काळात संधी देईल हा मला विश्वास आहे. रोहितला आता पक्षाचं पद किंवा जबाबदारी द्यायला हवी असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता आमदार रोहीत पवार यांनी रोहित पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याबाबत मोठे संकेत दिले आहेत.

त्यामुळे आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, मेहबूब शेख यांच्यावर औरंगाबाद येथील एक तरुणीनीने बलात्काराचे आरोप केले आहेत. त्यामुळे मेहबूब शेख यांच्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची त्यांच्यावर नाराजी असल्याचे बोलले जात आहे. ही संधी रोहित पाटील यांच्या पथ्यावर पडणार हे मात्र नक्की.