शरद पवार गटाची ताकत वाढली; माजी मंत्र्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत लातूर जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

Vinayakrao Patil joined NCP  :  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत लातूर जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत लातुर जिल्ह्यातील भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी पक्षप्रवेश प्रवेश केला. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या मतदारसंघाचे विनायक पाटील यांनी प्रतिनिधित्व केले होते. विनायक पाटील यांनी आपली राजकीय कारकीर्द कॉंग्रेसमधून केली. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते सहकार मंत्री होते.

यावेळी शरद पवार बोलताना म्हणाले की, विनायकराव पाटील व त्यांच्यासोबत आलेल्या सर्व सहकाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले. विनायकराव यांनी गेल्या अनेक वर्ष लातूर जिल्ह्यातील सर्व जनतेची सेवा केली आहे आणि करत राहणार आहेत. विनायकराव पाटील यांनी अधिक जोमाने काम करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे शरद पवार साहेब म्हणाले.

१९८० सालची आठवण काढत शरद पवार यांनी सांगितले की,१९८० साली निवडणुका झाल्या आणि त्यावेळी माझे ५९ आमदार निवडून आले होते. त्यानंतर काही कामानिमित्त मला परदेश दौऱ्यावर जावे लागले. आणि परत आल्यावर असं पाहिलं ५९ आमदारांमधून पाच आमदार राहिले आणि बाकी सगळे बंड करून निघून गेलेले होते. आणि पुन्हा निवडणुकीच्या वेळी जे सोडून गेले होते त्यातून दोन सोडले तर सगळ्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या जनतेने सर्वांना धडा शिकवला असल्याचे शरद पवार साहेब यांनी सांगितले.

आज देशाच्या समोर अनेक प्रश्न उभे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न या आरक्षणाच्या प्रश्न आधी देखील चर्चा झालेली असल्याचे शरद पवार साहेब यांनी सांगितले. मी स्वतः जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांचं म्हणणं काय आहे हे समजून घेतलं आणि त्यातून मार्ग काय काढता येईल याचाही विचार केलाकेंद्र आणि राज्य सरकारने आरक्षणाच्या विषयी लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता होती परंतु ती लांबणीवर गेली आहे. आणि त्याचा परिणाम आपण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वनव्याच्या स्वरूपात पाहत आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आग्रही भूमिका घेत आहे. आणि त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रियाताई सुळे हे देखील मराठा आरक्षण प्रश्नासाठी राज्यपालांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत .

जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या जरांगेंच्या उपोषणाची दखल घेत जरांगेंच्या मागण्यांची पूर्तता झाली पाहिजे असं शरद पवार साहेब म्हणाले तसेच केंद्र आणि राज्य सरकारने आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा असं देखील शरद पवार साहेब म्हणाले. कुणाच्याही ताटातलं न काढता मराठ्यांना आरक्षण द्या असे शरद पवार साहेब म्हणाले आहेत.मी अपेक्षा करतो की आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा जरांगे पाटलांची प्रकृती व्यवस्थित राहावी आणि महाराष्ट्रातली ही परिस्थिती लवकरात लवकर नीट व्हावी असेही शरद पवार म्हणाले.

आज राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये वेगळ्या लोकांची सत्ता आहे मी हे नेहमी सांगतो की सत्ता बदलत राहते. देशातील चित्र हे पहिल्यासारखं राहिलेलं नाही. मी मागेही माझ्या सभांमध्ये सांगितलं आपण जर आपल्या देशाचं सध्याचं चित्र पाहिलं तर भाजपच्या हातात सत्ता असली तरी प्रत्येक प्रांताची परिस्थिती वेगवेगळी आहे. देशात केरळ,कर्नाटक, तामिळनाडू , आंध्र प्रदेश, तेलंगणा, या राज्यांमध्ये भाजपचे सरकार नाही आणि महाराष्ट्रात देखील भाजप सत्तेत नव्हतं पण खोके देऊन लोकं फोडण्यात आले. आणि भाजपने सत्ता हातात घेतली.

अनेक राज्य अशी आहेत की ज्यांनी भाजपच्या हातातून सत्ता घेतली आहे. देशाच्या जनतेला बदल हवा आहे त्यामुळे ते भाजपला संधी देत नसल्याचं शरद पवार साहेब म्हणाले. आणि जनतेच्या प्रश्नांची पूर्तता करायची असेल तर योग्य त्या साथीदाराची गरज असते. त्याची सुरुवात आज विलासराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून केली. त्यामुळे आपल्या सर्वांना बदल घडवायचा आहे हा बदल फक्त सत्ता मिळवण्यासाठी नसून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बदल घडवायचा आहे. आणि हा बदल घडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काँग्रेस तसेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणजेच संपूर्ण महाविकास आघाडी आपण सगळे मिळून महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास देण्याचा प्रयत्न करू आपण सगळे मिळून लढल्यावर राज्याचं परिवर्तन जनतेचे प्रश्न हे लवकरच मार्गी लागणार असल्याचं शरद पवार साहेब म्हणाले.