आयपीएल २०२३ ‘थाला’चा शेवटचा हंगाम असेल का? रोहित शर्माने सांगितले धोनी कधी होणार निवृत्त

महेंद्रसिंग धोनी आयपीएल 2023 नंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेणार? महेंद्रसिंग धोनीची ही आयपीएल शेवटची आयपीएल असेल का? असे प्रश्न या सीझनमध्येच नाही तर गेल्या अनेक आयपीएल सीझनपासून ऐकायला मिळत आहेत, पण धोनी (MS Dhoni IPL Retirement) दरवर्षी या अफवांना खोटे ठरवतो. यावेळी आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माने (Rohit Sharma) पत्रकार परिषदेत या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

आयपीएल 2023 चा सीझन 31 मार्च, शुक्रवारपासून सुरू होत आहे आणि पहिल्याच सीझनमध्ये प्रेक्षकांना त्यांचा आवडता क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी मैदानावर अॅक्शनमध्ये दिसेल. रोहित शर्माला पत्रकार परिषदेत याबाबत विचारण्यात आले की धोनी आयपीएल 2023 नंतर निवृत्त होणार का? हा प्रश्न ऐकून रोहित मुंबई इंडियन्सच्या प्री-प्रेस कॉन्फरन्समध्ये गोंधळलेल्या स्वरात म्हणाला, “मी गेल्या 2-3 वर्षांपासून ऐकतोय की हा सीझन एमएसचा शेवटचा आयपीएल सीझन असणार आहे. मला वाटतं की तो अजूनही फिट आहे. आणखी काही सीझन खेळण्यासाठी पुरेसे आहे.”