कॅप्टन्सीच्या तणावामुळे रोहित शर्माचं पडलंय टक्कल, केस गळती पाहून चाहत्यांकडून हेअर ट्रान्सप्लांटचा सल्ला

Rohit Sharma’s Hair Fall: सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. दरम्यान, कॅप्टन रोहित शर्माचे (Captain Rohit Sharma) असे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये त्याचे केस गळाल्याने टक्कल पडल्याचे दिसत आहेत. फोटो पाहता, रोहित शर्माचे केस वेगाने गळत असल्याचे दिसत आहे.

चाहते सोशल मीडियावर रोहित शर्माच्या फोटोसह मीम्स बनवत आहेत आणि त्याला हेअर ट्रान्सप्लांटचा सल्लाही देताना दिसत आहेत. कोणत्याही क्रिकेटपटूसोबत त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत केसगळतीचा सामना करण्याची ही पहिलीच घटना नाही. असे अनेक खेळाडू होऊन गेले. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सचाही समावेश आहे. महान फलंदाज एबी डिव्हिलियर्स देखील त्याच्या कारकिर्दीत केसगळतीचा बळी ठरला होता. त्याचबरोबर कर्णधारपदाच्या चिंतेमुळे रोहित शर्माचे केस उडत असल्याचेही काही लोक म्हणताना दिसत आहेत.

https://twitter.com/LokeshVirat18K/status/1684565526952157184?s=20