मी नाराज नाही, जो पक्षाचा निर्णय असेल त्याला माझा पाठिंबा असेल; संजय राऊत यांची सारवासारव

Mumbai – शिवसेनेच्या (Shivsena) खासदारांनी मातोश्रीवर (Matoshree) झालेल्या बैठकीत एनडीएच्या (NDA) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. याबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुढील दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीत राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मात्र यशवंत सिन्हांना पाठिंबा देण्याची ठाम भूमिका मांडली. त्यामुळे संजय राऊत विरूद्ध इतर खासदार असा सामना रंगला. या बैठकीनंतर नाराज झालेले संजय राऊत माध्यमांशी न बोलता सामना कार्यालयकडे निघून गेले. यामुळे संजय राऊत हे नाराज असल्याची चर्चा सुरु झाली होती.

दरम्यान, पक्ष घेईल तो निर्णय मला मान्य असेल, मी नाराज नाही म्हणत संजय राऊत यांनी आपली भूमिका ही स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता शिवसेना ही द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu) यांनाच निवडणुकीत पाठिंबा देणार का? असा सावल उपस्थित झालाय.बैठकीत सर्व विषयांवर चर्चा झाली. राष्ट्रपती निवडणुकींबाबतही चर्चा झाली. शिवसेनेने राजकारणाच्या पलिकडे जाऊन राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिला आहे. सर्व खासदारांनी निर्णय घेण्याचा अधिकार पक्षप्रमुखांना दिला आहे. त्यांचा आदेश बंधनकारत आहे. त्यामुळे मी नाराज नाही, जो पक्षाचा निर्णय असेल. त्याला माझा पाठिंबा असेल. अशा बातम्या कुणीही चालवू नको. मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील आणि त्या निर्णयाच्या मागे सर्व खासदार उपस्थित राहतील, अशी प्रतिक्रिया नाराजीच्या वृत्तावर संजय राऊत यांनी दिली आहे.