अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे

गंगाखेड/विनायक आंधळे – अपघातग्रस्तांच्या मदतीला धावल्याने गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे (MLA Ratnakar Gutte) यांच्या संवेदनशीलतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. मौजे शिवाजीनगर तांडा ता. गंगाखेड (Gangakhed) येथील अनिल आडे हे, दीपावली निमित्त माहेरी आलेल्या आपल्या बहिणीला परत सासरी पालमकडे (Palam) सोडण्याकरिता जात असताना त्यांची गाडी स्लीप होऊन त्याचा अपघात (Accident) झाला. यात अनिल आडे आणि त्याच्या दोन भाच्यांना दुखापत झाली. या प्रसंगी त्यांना मदतीची गरज असताना रस्त्याने ये-जा करणारे नुसते पाहून पुढे निघून जात होते.

यावेळी रत्नाकर गुट्टे हे आपल्या फार्म हाऊस वरून गंगाखेड कडे येत असताना ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी गाडी उभी करून अपघातग्रस्तांना स्वतःच्या गाडीतून उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे उपचारासाठी दाखल केले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. अपघातग्रस्तांना मदत करीत आमदारांनी तात्काळ मदत उपलब्ध करून देत माणुसकीचे दर्शन घडविले यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.