नुपूर शर्मांचं शिरच्छेद करण्यास उत्तेजन देणाऱ्या सलमान चिश्तीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

नवी दिल्ली : भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांनी (Nupur Sharma) केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद अजूनही उमटत आहेत. यातच अजमेरच्या दर्ग्यामधील खादिम सलमान चिश्तीने  वादग्रस्त विधान (Controversial statement)केलं होतं. सलमान चिश्तीने (Salman Chishti) एका व्हिडीओमध्ये भाजपच्या(BJP) माजी प्रवक्त्या यांच्यावर बोलताना प्रक्षोभक विधानं केली होती.

सलमान चिश्तीने  नुपूर शर्माचं शिर धडावेगळं करेल, त्याला मी माझं घर देईन, असं विधान त्यांनी केल्याचं व्हायरल व्हिडिओमधून (Viral Video)समोर आलं होतं. मात्र आता नुपूर शर्माचा शिरच्छेद करण्यासाठी उत्तेजन देण्याऱ्या  सलमान चिश्तीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मंगळवारी रात्री उशिरा दर्गा पोलिसांनी दर्गा परिसरातून त्याला अटक केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान चिश्ती याच्यावर हत्या, जीवघेणा हल्ला, गोळीबार आणि मारहाणीचे डझनभर गुन्हे दाखल आहे. याआधी सलमालला त्याच्या आईच्या तक्रारीवरून अटक करण्यात आली होती. आपल्या आईला घराबाहेर काढण्याचा त्याच्यावर आरोप होता.