जीवे मारण्याच्या धमक्या येत असताना सलमान खानने स्वतःच्या सुरक्षेसाठी केली ‘ही’ खास व्यवस्था केली

Salman Khan New SUV : गेल्या काही महिन्यांत सलमान खानला (Salman Khan) लॉरेन्स बिश्नोई आणि टोळीकडून जीवे मारण्याच्या अनेक धमक्या आल्या आहेत. सतत धमक्या मिळाल्यानंतर या अभिनेत्याला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. त्याचबरोबर स्वतः सलमानने त्याच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था केली आहे. सलमानने एक महागडी बुलेट प्रूफ कार (Bullet Proof Car) खरेदी केली आहे. सलमान अनेकदा आलिशान पांढऱ्या कारमधून प्रवास करताना दिसतो. सलमानची नवी कार ही बुलेटप्रूफ निसान पेट्रोल एसयूव्ही आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार (Media Reports), ही कार सध्या भारतीय बाजारात उपलब्ध नाही. सलमान खानने ही कार खास आयात केली आहे.

सलमानच्या नव्या बुलेटप्रूफ कारची खासियत ?

रिपोर्ट्सनुसार, सलमान खानची बुलेटप्रूफ कारला B6 किंवा B7 लेव्हलची सुरक्षा आहे. बॅलिस्टिक संरक्षणासह B6 आणि 41 मिमी जाडीची काच उच्च-शक्तीच्या रायफलने फायर करण्यात आल्यानंतर देखील आतील लोकांना सुरक्षित ठेवते. 78 मिमी जाडीची काच असलेली B7 चिलखत-छेदणाऱ्या राउंडपासून संरक्षण करते. ही कार आता सलमान खानच्या आधीच्या टोयोटा लँड क्रूझर LC200 ची जागा घेईल.