बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चक्रीवादळ येण्याची शक्यता

 नवी दिल्ली – बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असूनतो अंदमान आणि निकोबार बेटांकडे सरकत आहे. ह्या कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर उद्यापर्यंत चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे.

हे चक्रीवादळ नंतर बांगलादेश आणि म्यानमाकडे सरकेल. निकोबार बेटांवर कालपासून जोरदार वारे वहात असून मुसळधार पाऊस पडत आहे. पुढचे दोन दिवस समुद्र खवळलेला राहील आणि वाऱ्याचा वेग ताशी 90 किलोमीटर पर्यंत पोहोचेल.

अंदमानमधल्या पोर्ट ब्लेअर मध्येही हलका पाउस पडत आहे. खबरदारी म्हणून अंदमान आणि निकोबार बेटं 22 मार्चपर्यंत पर्यटनासाठी बंद करण्यात आली असून शाळा आणि बंदर बंद राहणार आहे. आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.