‘नाटू नाटू’ गाण्याने रचला इतिहास, गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकत उंचावली भारताची मान

Natu Natu Song: सध्या लॉस एंजेलिस येथे सुरू असलेल्या 80 व्या गोल्डन ग्लोब्सने 11 जानेवारी रोजी सकाळी कॉमेडियन जॅरॉड कार्माइकलने आयोजित केलेल्या समारंभाद्वारे हॉलिवूडच्या पुरस्कारांच्या हंगामाची सुरुवात केली. पुरस्कारांच्या या समारंभापूर्वी RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या प्रादेशिक लोकगीतात आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवण्याची क्षमताही आहे, असा विचार कोणीही केला नव्हता. मात्र आता याच गाण्याने इतिहास रचला आहे.

RRR चित्रपटाला दोन श्रेणींमध्ये प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कार 2023 साठी नामांकन मिळाले होते- नाटू नाटू सर्वोत्कृष्ट मूळ गाणे आणि सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर. आता एसएस राजामौली दिग्दर्शित RRR चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याच्या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे. गोल्डन ग्लोबची (Colden Globe Awards) गणना ऑस्करनंतरच्या दुसऱ्या सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कारांमध्ये केली जाते. हॉलीवूड फॉरेन प्रेस असोसिएशनने याचे आयोजन केले आहे.