सांगली हादरली! अज्ञातांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर धाड धाड झाडल्या ८ गोळ्या

Sangli Crime: काही दिवसांपूर्वीच सांगलीत भरदिवसा दरोडा पडल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आता गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांच्यावर राहत्या घरात अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला हे सांगली शहरातील १०० फुटी जवळ आपल्या राहत्या घराच्या दारात बसले होते. यावेळी काही हल्लेखोर आले. त्यांनी नालसाब यांच्यावर तब्बल आठ गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते तिथून पसार झाले. नालसाब मुल्ला यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. असे असले तरीही, नालसाब मुल्ला यांच्यावरील हल्ल्यामागचं कारण अद्याप समजलेलं नाही.