शिशिर शिंदे यांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’, मनासारखं काम मिळत नसल्याने घेतला निर्णय

Shishir Shinde Resigns : रविवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे उपनेते शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच आपल्या पक्षात मनासारखं काम करायला मिळत नसल्याची तक्रार यावेळी शिशिर शिंदे यांनी केली.

मनसेची स्थापना झाल्यावर शिशिर शिंदे शिवसेनेतून राज ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करण्यास गेले होते. त्यानंतर १९ जून २०१८ रोजी शिशिर शिंदे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. साधारण ४ वर्षे त्यांच्याकडे फार मोठी जबाबदारी नव्हती. मात्र एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ३० जून २०२२ रोजी शिशिर शिंदे यांची उपनेतेपदी वर्णी लागली होती.

शिशिर शिंदे हे २००९ ला भांडुप विधानसभा मतदार संघातून आमदारपदी निवडून आले होते. त्यानंतर २०१४ साली झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.