Sanjay Gaikwad | शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा धक्कादायक व्हिडिओ, काठी घेऊन मिरवणुकीत युवकांना मारहाण

Sanjay Gaikwad Beating Youngster : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी आपण वाघाची शिकार केली असल्याचा दावा केला होता, ज्यामुळे ते वन विभागाच्या रडारवर आहेत. अशातच आता त्यांचा एका युवकाला काठीने मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ बुलढाण्यातील शिवजयंती मिरवणुकी दरम्यानचा आहे. या मिरवणुकीत आमदार संजय गायकवाड युवकांना पोलीस काठीने मारहाण करताना दिसत आहे. त्यांच्या बॉडीगार्डची काठी घेऊन युवकांना सपासप मारहाण ते करत आहेत. त्यामुळे शिवजयंती मिरवणुकीत गोंधळ उडाल्याचे दिसत आहे. दरम्यान घटनेवेळी पोलीस कर्मचारी उपस्थित असून पोलिसांकडून काहीच पावले उचलली गेली नाहीत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Manoj Jarange Patil | मविआकडून जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? मनोज जरांगे पाटील म्हणाले…

Ajit Pawar | ‘त्या’ प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही; अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

Ashish Shelar | कोकणातील आंबा काजु उत्पादकांवर अन्याय का? आशिष शेलार यांचा सवाल