पंकजा मुंडेंचे तिकीट कापल्याने संतप्त झालेल्या समर्थकाने चंद्रकांत पाटलांना दिला ‘हा’ इशारा

पिंपरी चिंचवड – विधानपरिषद निवडणुकीसाठी (MLC election) भाजपने  प्रवीण दरेकर (Pravin Darekar), राम शिंदे (Ram Shinde), प्रसाद लाड (Prasad Lad) आणि श्रीकांत भारतीय यांच्यासह उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ (Pankaja Munde and Chitra Wagh) यांना मात्र संधी मिळालेली नाही, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवाल्या आहेत.

दरम्यान,  पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांना सुरवातीला राज्यसभेचे व नंतर विधानपरिषदेच्या उमेदवारीचे तिकीट भाजप पक्ष श्रेष्ठींनी दिले नाही. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शहरात पाय ठेवू देणार नाही, अन्य़था त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा पंकजा मुंडे समर्थक दत्ता कायंदे (Datta Kayande) यांनी दिला. मास लिडर, लोकनेत्या पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाणुनबुजून न देऊन त्यांना डावललण्यात आल्याचा दावा त्यांनी त्यात केला आहे.

विरोधी पक्षनेतेदेवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील  (Devendra Fadnavis and Chandrakant Patil) हे पार्टी ताब्यात घेऊन हुकुमशाही करत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला. फडणवीसांचे पीए आमदार होतात, पंकजांताईंच्या जवळच्या लोकांनाही संधी मिळते. कालपर्यंत नाव असताना त्यांचा पत्ता एकदम कट होतो, याबद्दल कायंदेनी आश्चर्य व्यक्त केले. फडणवीस टोळीला स्व.गोपीनाथ मुंडे आणि पंकजा यांची अॅलर्जी झाली आहे, असे ते म्हणाले.