मोदींच्या वक्तव्यांवर मीच का बोलू ?, संजय राऊत यांचा सरकारला घरचा आहेर

मुंबई : आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केले आहे. कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्राने केलेल्या कामाचं कौतुक जगभरातून केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल लोकसभेत नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेबाबत म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महाराष्ट्राने देशभरात कोरोना पसरवल्याचा आरोप केला होता. पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यांवर सरकारमध्ये बसलेल्या नेत्यांनी बोलायला पाहिजे. प्रत्येक मुद्द्यावर मीच का बोलू. सरकार मधील कोणताचा नेता यावर बोलत नाही, असं बोलून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या काळात सोनू सुद चांगला काम करत होता. त्याला आम्ही समजवलं की, इतकी घाई करू नको. आम्ही सर्व काही व्यवस्थित करू. याच मुद्द्यावर भाजपने आमच्यावर टीका केली. मात्र त्यानंतर भाजपनेच सोनु सुदला राजभवनात नेऊन त्याचा सत्कार केला.

गोव्यात चांगले संकल्प परिपत्रक फक्त नितीन गडकरीच करू शकतात. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने जाहीरनाम्यात चांगल्या गोष्टी करत असतील तर त्याचं आम्ही स्वागतच करतो. त्यांच्या काही गोष्टी आम्हाला आवडल्या तर त्या आम्ही देखील करू. भाजपाशी आमचं काही नळावरचं भांडण नाही. देशासाठी, राज्यासाठी त्यांनी जाहिरनाम्यात चांगल्या गोष्टी करायचा निर्णय घेतला असेल तर नक्कीच त्यांच्या गोष्टी आम्ही घेऊ. त्यांनी आमच्या घ्यायला हवं.