आमचे सर्व देव गोव्यात, गोव्याशी असलेल्या नात्याचं सर्टिफिकेट तुम्हाला दाखवू का ? – संजय राऊत

पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संजय राऊत हे गोवा दौऱ्यावर आहेत. मागील काही दिवसांपासून गोव्यात निवडणुकीची रणधुमाळी बघायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील काल प्रचार सभा गोव्यात पार पडली. कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, आप शिवसेना, आणि भाजप हे पक्ष गोव्यात निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत.

गोमंतकची जी पुकार आहे की, आम्हाला शिवसेना हवी आहे. ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो. तिथे लोकं सांगताहेत की तुम्ही अगोदरच का आले नाही. आम्ही तुमची वाट पाहत होतो. गोव्यात शिवसेना नवीन नाही. आम्ही याठिकाणी लढतोय, काम करतोय. परंतु यावेळी आदित्य ठाकरे यांनी ठरवलं की, जोरदार लढाई करायची. विधानसभेत आमदार जातील आणि भविष्यात गोव्यावर शिवसेनेचे राज्य येईल, अशी आशा संजय राऊत यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा काल गोव्यात झाली. ते सांगितलं होतं की, आमचं गोवेकरांशी जुनं नात आहे. मग आमचं काय आहे. जर गोव्याशी ज्यांचे जुने संबंध आहेत ते फक्त शिवसेनेचे आहेत. आमचे सगळे देव गोव्यात अजून काय पाहिजे? गोव्याशी असलेल्या नात्याचं सर्टिफिकेट आता तुम्हाला दाखवू का ? अर्धे गोवेकर शिवसेनेत आहेत. जे आहेत तेपण शिवसेनेत आहेत. त्यामुळे आम्हाला नातीगोती सांगू नका. गोव्यातील जो मुळ पक्ष आहे. त्या पक्षाचे नाव महाराष्ट्र गोमंतकवादी आहे. त्या पक्षाचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर त्यांची आणि बाळासाहेब ठाकरे यांची जीवलग मैत्री असल्याचं त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आम्ही याअगोदर याठिकाणी आलो नाही, कारण बाळासाहेब नेहमी म्हणायचे. भाऊसाहेबांचा पक्ष गोव्यात काम करतोय. ते हिंदू माणसाचं नाव बुलंद करत आहेत. ते आपलंच काम करत आहेत. त्यामुळे आपल्याला त्याठिकाणी जाण्याची गरज नाही. हे विशाल ह्यदय बाळासाहेब यांचं आहे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आता आम्ही ठरवलं आहे की, गोव्यात फक्त शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार.