कोर्टात जाण्याची गरज नाही, वरचं न्यायालय आमच्यावर..; शिक्षा सुनावल्यानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

मुंबई : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्यामुळे राज्याचे राज्य शिक्षण मंत्री बच्चू कडू यांना २ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चांदुर बाजार येथील प्रथम वर्ग एक ने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. भाजपचे अमरावतीतील अचलपूरचे नगरसेवक गोपल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ज्या ठाणेदारांनी एका गरीब माणसाला २० हजार रूपायासाठी लबाडलं होतं. त्या ठाणेदाराला थोडसं आमच्या पद्धतीने सबब दिला होता. त्यांनी आमच्यावर डाव काढला. मग त्यांनी ही तक्रार घेतली. दुसरा एक विरोधक पकडला. त्यातून ही केस निर्माण केली. यामध्ये दोन महिन्याची शिक्षा सुनावली आणि २५ हजार रुपयाचा दंड आम्हाला ठोठवला आहे. वरच्या कोर्टात जाऊन काही होणार नाही. वरचं न्यायालय आमच्यावर न्याय करेल यावर मला आत्मविश्वास आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी बच्चू कडू यांनी निवडणुकीच्या माहिती पत्रात मुंबई येथील फ्लँटची माहिती लपवल्याची त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. यांसदर्भात भाजपचे नगरसेवक गोपल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणाची सुनावणी मुंबईतील चांदुरबाजार येथील न्यायालयात चालू होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन महिन्याची शिक्षा सुनावली आहे.

बच्चू कडू यांना न्यायालयाने २५ हजार रूपयांचा देखील दंड ठोठवला आहे. तसेच त्यांना २ महिन्याची शिक्षा देखील सुनावणी आहे. त्यामुळे बच्चू कडू यासंदर्भात कोणत्या न्यायालयात दाद मागणार तसेच ते यासंदर्भात काय भूमिका घेणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.