शिवसेना खासदार राहुल शेवाळेही वेगळ्या मार्गावर? द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी

मुंबई – मुंबईतील खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) पत्र लिहिलं आहे. १८ जुलैला होत असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार असलेल्या द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्यात यावा, अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे. शेवाळे यांनी ठाकरेंना लिहिलेलं पत्र ट्विट केलं आहे. शेवाळेंच्या या पत्रामुळे ठाकरेंची गोची होऊ शकते.(Mumbai MP Rahul Shewale has written a letter to Uddhav Thackeray regarding the presidential election.)

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षीय राजकारणाला छेद देत, महाराष्ट्राची कतृत्त्ववान महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावी, याच हेतूने माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दर्शविला होता. तसेच दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कर्तृत्वाचा आदर करत शिवसेनेने त्यांना पाठिंबा दर्शविला होता. हीच परंपरा कायम ठेवत, आदिवासी समाजातील एका कतृत्त्ववान महिलेचा सन्मान करण्यासाठी शिवसेना पक्षाने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा आणि त्यासाठी पक्षाच्या सर्व खासदारांना आदेश द्यावा, अशी विनंती शेवाळे यांनी पक्षप्रमुखांकडे केली आहे.

राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावरही शेअर केले आहे. शेवाळे यांनी केलेल्या पत्रात ट्विट आदिवासी समाजातील सक्षम आणि कतृत्त्ववान महिला म्हणून शिवसेनेने भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी लेखी मागणी माझ्या वतीने माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.